विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी टीसीची नवी शक्कल, कोट्यवधी दंड वसूल

विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी टीसीची नवी शक्कल, कोट्यवधी दंड वसूल

मुंबई: उपनगरीय लोकलमधून ठराविक वेळेत सर्व सामान्य प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, काही प्रवासी या वेळेत प्रवास करताना आढळून येत आहेत. तर काही प्रवासी गर्दी नसलेल्या वेळी विना तिकीट किंवा अनियमित तिकीट घेऊन प्रवास करत आहेत. अशा फुकट्या प्रवाशांना पकडण्यासाठी टीसीचा लोकलमधून प्रवास करत आहेत. यासह फलाटावरील विना तिकीट प्रवाशांना पकडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 1 लाख 58 हजार फुकट्या प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून 4 कोटी 95 लाखांचा दंड वसूल केला आहे. 

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने 15 जून 2020  ते 31 जानेवारी 2021 पर्यंत लोकलमधून आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये जाऊन नियमित आणि सखोल तिकीट तपासणीच्या मोहीमा राबविल्या. या तपासणी दरम्यान 1 लाख 58 हजार विनातिकीट प्रवास करणारे आढळून आले.  त्यांच्याकडून 4 कोटी 95 लाखांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती मध्य रेल्वे  प्रशासनाकडून देण्यात आली. 

ज्येष्ठ नागरिक कोट्याचा दुरुपयोग, बदललेल्या तिकिटांवर प्रवास करणे, सिस्टमद्वारे जनरेट तिकिटांचे ई-तिकिटांमध्ये रूपांतर करणे, तिकिटांच्या रंगीत झेरॉक्सने प्रवास करणे, बनावट ओळखपत्रांसह प्रवास करणे, तिकिटांचे ट्रान्सफर करण्यासारखी प्रकरणे या मोहिमादरम्यान आढळून आल्या.

लोकलमधून सुमारे 1 लाख 21 हजार विना तिकीट प्रवाशांना पकडण्यात आले.  यातून  2 कोटी 87 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील 37 हजार 823 प्रवाशांना पकडून २ कोटी ०९ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. 

सन्मानाने प्रवास करा
 लोकलमधील गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी योग्य आणि वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

local train without ticket passengers caught fine recovered ticket collector

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com