Local Trains Late Every Day Banner Near Kopar Station
sakal
मुंबई - मध्य रेल्वेच्या लोकलच्या विलंबाविरोधातील प्रवाशांचा संताप आता थेट रेल्वे रुळालगत लावलेल्या बॅनरमधून व्यक्त झाला आहे. दिवा-डोंबिवलीदरम्यान कोपर स्थानकाजवळ पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या बाजूला लावण्यात आलेल्या या बॅनरने प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘लोकल उशिरा... रोज रोज प्रवाशांना लेट होते, त्याचा परिणाम त्यांच्या कामावर होतो आणि त्यांच्या कुटुंबावर होतो. म्हणून सेंट्रल रेल्वेने आपल्या गाड्या वेळेवर सोडाव्यात... प्रवासी’, असा मजकूर बॅनरवर लिहिण्यात आला आहे.