
Panvel Vasai Local Train
मुंबई : मुंबईच्या उपनगरातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता पनवेल ते वसईदरम्यान थेट लोकल धावणार आहे. पुढे हा मार्ग बोरिवली आणि विरारपर्यंत विस्तारण्याचा मार्गही खुला झाला आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) या नव्या उपनगरी रेल्वेमार्गाचा समावेश ‘एमयूटीपी ३ ब’ प्रकल्पात केला आहे.