फाटकांमुळे 100 गाड्यांना ब्रेक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 मे 2018

मुंबई : उत्तर प्रदेशातील खुशीनगर रेल्वे अपघातात 13 जणांना नाहक जीव गमवावा लागल्यानंतर देशभरातील फाटके मानवविरहित करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयातर्फे देण्यात आले आहेत. मुंबई आणि उपनगरांत मध्य रेल्वे मार्गावरील फाटकांमधून सर्रास ये-जा सुरू असते. याचा फटका मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाला बसत असून यामुळे तब्बल शंभर लोकल उशिराने धावत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

'प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्हाला खेद आहे', ही उद्‌घोषणा मुंबईकरांसाठी नवी नाही. रेल्वेमुळे होणारा खोळंबा, गर्दी, ओव्हरहेड वायर तुटणे, फाटकांवर होणारे अपघात, यांमुळे अनेकदा गाड्यांना उशीर होतो. 

रेल्वेचा हा खोळंबा काहीसा कमी करण्यासाठी रेल्वे फाटक बंद करून त्या जागी उड्डाणपूल बांधण्याचे काम हाती घेतले जात आहे. काही ठिकाणी पूर्व- पश्‍चिमेला जोडणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी स्थानिक पालिकांच्या कारभाराचा फटका रेल्वेला बसत आहे. 

दिवा स्थानकातील फाटक सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान तब्बल 38 वेळा, तर ठाकुर्ली, कल्याण, कळवा, आंबिवली येथील फाटक 13 वेळा उघड-बंद होतो, यामुळे 80 ते 90 गाड्यांच्या फेऱ्या दररोज 10 मिनिटे उशिराने धावतात. चुनाभट्टी व वांद्रे स्थानकातील रेल्वे क्रॉसिंग प्रवेशद्वारामुळे गाड्यांना सतत थांबा द्यावा लागतो. 

उत्तर प्रदेशातील बस दुर्घटनेनंतर जाग आलेल्या मध्य रेल्वे प्रशासनाने एका महिन्यासाठी रेल्वे सुरक्षा तपासणी मोहीम हाती घेतली आहे. लवकरच मोहिमेची सुरुवात होणार असून त्यासाठी एक पथक नेमले आहे. हे पथक रेल्वे क्रॉसिंग फाटक ऑपरेटर व त्यामुळे त्याला भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेईल, तसेच वाहने व पादचारी येथून मार्गक्रमण करत असताना त्यांना रेल्वे फाटक चालू व बंद अवस्थेबाबत माहिती देतील. 

ठाकुर्लीत नवा पूल 
ठाकुर्ली स्थानकातील रेल्वे फाटक 1 मेपासून बंद करण्यात येणार आहे. याऐवजी बांधलेल्या नव्या पुलाचा वापर प्रवाशांना करता येणार आहे. हा पूलही लवकरच सुरू होईल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Locals running late due to open railway crossings