नवी मुंबईत सरसकट लॉकडाऊन रद्द; आयुक्तांनी घेतले महत्वपुर्ण निर्णय वाचा सविस्तर

सुजित गायकवाड - सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 July 2020

कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या प्रमाणामुळे शहरात लागू केलेला सरसकट लॉकडाऊन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अखेर शिथिल केला.

 

नवी मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या प्रमाणामुळे शहरात लागू केलेला सरसकट लॉकडाऊन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अखेर शिथिल केला. त्याऐवजी महापालिकेने नव्याने घोषित केलेल्या 42 हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. हॉटस्पॉटच्या चतुःसीमा पूर्णपणे बंद करून फिरण्यावर निर्बंध घालण्यात येणार आहे. 

मुंबईतील कोरोना नियंत्रणात परंतु; 'या' प्रभागाने पुन्हा वाढवली चिंता...

नवी मुंबई शहरात तत्कालीन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी 29 जून पासून फक्त कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन घोषित केला होता. त्यानंतर तो सरसकट सर्वच शहरी भागात लागू करण्यात आला होता. त्यानुसार हा सरसकट लॉकडाऊन 19 जुलैला रात्री 12 वाजता संपणार होता. त्याधर्तीवर आज रात्री लॉकडाऊन संपत असल्याने आयुक्त अभिजीत बांगर यांनी एक बैठक घेतली होती. या बैठकीत शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आढावा घेण्यात आला. या काळात शहरातील कोरोनाच्या रुग्णांवर काही परिणाम दिसून आला नाही. उलट लॉकडाऊनच्या काळात कोरोनाचे अधिक रुग्ण वाढले होते. त्यामुळे प्रशासनातर्फे सुरू असणारा सरसकट शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी 42 ठिकाणांना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या हॉटस्पॉटमध्ये 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. याकाळात हॉटस्पॉट म्हणून घोषित केलेल्या शहरी भागाच्या चतुःसीमा पूर्णपणे बंद केली जाणार आहे. तसेच या भागात काटेकोरपणे टाळेबंदी अमलात आणण्यात येणार आहे. ज्या भागात लॉकडाऊन नसेल त्याभागात मिशन बिगेन अनलॉकचे नियम लागू असतील. तसेच मॉल्स, मार्केट आणि बाजारपेठांवर निर्बंध घालण्यात आल्याची माहिती बांगर यांनी दिली. 

जगप्रसिद्ध रेसलर जॉन सीनाने केली बच्चन कुटुंबीयांसाठी प्रार्थना..

हे आहेत हॉटस्पॉट 

करावे गाव, दिवाळे गाव, दारावे, सिवूडस सेक्टर 48, बेलापूर गाव, सीबीडी-बेलापूर सेक्टर 8 ए, नेरुळ सेक्टर 10, नेरुळ सेक्टर 6, नंदनवन सोसायटी नेरुळ सेक्टर 10, तुर्भे सेक्टर 21, तुर्भे सेक्टर 22, तुर्भे सेक्टर 20, सानपाडा सेक्टर 5, सानपाडा सेक्टर 30, सानपाडा सेक्टर 9, सानपाडा सेक्टर 4, सानपाडा सेक्टर 15, कोपरी गाव, सानपाडा सेक्टर 16 ए, वाशी सेक्टर 26, कोपरखैरणे सेक्टर 4, कोपरखैरणे सेक्टर 19, घणसोली नोसिलनाका, घणसोली कातकरीपाडा, ऐरोली सेक्टर 20, ऐरोली सेक्टर 10, ऐरोली जय भवानी चाळ, ऐरोली यादवनगर, ऐरोली गणेशनगर, देवीधाम ऐरोली, आंबेडकर पुतळा ऐरोली, प्रजापती चाळ चिंचपाडा, जुना चिंचपाडा, साईनाथवाडी ऐरोली, पंढरीनगर इलठानपाडा दिघा, विष्णुनगर दिघा, इलठाणपाडा दिघा, दिघा पूर्व, रामनगर इलठाणपाडा, महात्माफुले नगर इलठाणपाडा, गणपतीपाडा, सुभाषनगर दिघा

--------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown canceled in Navi Mumbai; Read in detail the important decisions taken by the Commissioner