esakal | Lockdown : मुंबईत 'सीआरपीएफ'ची पथके दाखल होणार?
sakal

बोलून बातमी शोधा

CRPF

नियंत्रणात न येणारा संसर्ग रोखण्यासाठी मुंबईत सीआरपीएफच्या तुकड्या येत्या तीन चार दिवसात तैनात केल्या जाणार आहेत.

Lockdown : मुंबईत 'सीआरपीएफ'ची पथके दाखल होणार?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : नियंत्रणात न येणारा संसर्ग रोखण्यासाठी मुंबईत सीआरपीएफच्या तुकड्या येत्या तीन चार दिवसात तैनात केल्या जाणार आहेत. केंद्रीय गृहखात्यातील वरिष्ठ अधिकार्यांनी मुंबईचे पोलिस सहआयुक्त विनय चौबे यांना क्षेत्रनिहाय गरज सांगा असे विचारले असल्याचे समजते.

महत्वाची बातमी : मुंबई विद्यापीठाकडून 158 परीक्षांचे नियोजन सुरू, वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

डीसीपी ऑपरेशन्स यांच्याशी सविस्तर चर्चा करून याबद्दलची आकडेवारी कळवली जाणार आहे. पोलिसांचे होत असणारे हाल तसेच त्यांच्यावर पडणारा ताण लक्षात घेता त्यांना आरामाची गरज असल्याचे सूचक उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच व्यक्त केले होते.

नक्की वाचा : लॉकडाऊनमुळे नोकरी मिळत नाहीये?..घाबरू नका.. अशी मिळवा नोकरी

येत्या काही दिवसात सीआरपीएफच्या तुकड्या मुंबईत सक्रीय होतील हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.

 Lockdown: CRPF squads to arrive in Mumbai? read full story