मुंबई विद्यापीठाकडून 158 परीक्षांचे नियोजन सुरू, वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 मे 2020

राज्य सरकारने परिक्षांबाबत निर्णय जाहीर केल्यानंतर मुंबई विद्यापीठाने पदविका, पदवी पूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील 158 परीक्षांच्या नियोजनासह शैक्षणिक वेळापत्रकासाठी कृती आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई :  राज्य सरकारने परिक्षांबाबत निर्णय जाहीर केल्यानंतर मुंबई विद्यापीठाने पदविका, पदवी पूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील 158 परीक्षांच्या नियोजनासह शैक्षणिक वेळापत्रकासाठी कृती आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे.

मोठी बातमी : डिपार्टमेंटमध्ये फोफावतोय कोरोना; राज्यात एकूण 714 पोलिस कोरोना बाधीत

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या 158 परीक्षेसाठी सुमारे 2 लाख 22 हजार 581 विद्यार्थी प्रविष्ठ आहेत. या परीक्षेच्या कृती आराखड्यान्वये ग्रेडींग पॅटर्न, एटीकेटी, दूर व मुक्त अध्ययन संस्थेतील वार्षिक परीक्षा पद्धतीनुसार प्रविष्ठ झालेले विद्यार्थी, महाविद्यालयांच्या शंकांचे निरसन याचा अभ्यास करून परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठ प्रशासन लवकरच जाहीर करणार आहे.

हे ही वाचा : तुमचं काम कौतुकास्पद, मात्र कायद्याचे भान ठेवा; उच्च न्यायालयाचे खडे बोल...

विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्गमित केलेली मार्गदर्शक तत्वे आणि राज्य सरकारने गठीत केलेल्या समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठामार्फत परीक्षांचा कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. पदविका, पदवीपूर्व आणि पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षातील अंतिम सत्राची परीक्षा घेताना सामाजिक अंतर, विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आरोग्य यांसह अनुषंगिक बाबींचा सखोल अभ्यास करुन परीक्षांचे नियोजन करण्यात येणार असून त्यानुसार या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच विद्यापीठामार्फत जाहीर केले जाणार असल्याचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले.
तसेच कोरोनाच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा आणि त्यांच्या शैक्षणिक हितासाठी मार्गदर्शन मिळावे यासाठी विद्यापीठामध्ये विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष आणि हेल्पलाईन सुरु करण्यात येणार आहे. परीक्षांसाठी तसेच शैक्षणिक वेळापत्रकाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि सहाय्य मिळणेसाठी जिल्हानिहाय समुपदेशनाची सोय लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. परीक्षा आणि शैक्षणिक वेळापत्रकाचे नियोजन करण्यासाठी कृती आराखडा तयार झाल्यावर महाविद्यालयांसाठी परिपत्रक, परीक्षांचे वेळापत्रक, आसनव्यवस्था, आणि विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे जाहिर केली जाणार असल्याचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

Mumbai University starts planning for 158 exams, exam schedule will be announced soon


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai University starts planning for 158 exams, exam schedule will be announced soon