esakal | Lockdown Effect: सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण

बोलून बातमी शोधा

Share Market
Lockdown Effect: सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण
sakal_logo
By
कृष्णा जोशी

मुंबई: कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता आणखी कठोर निर्बंधांसह राज्यात लॉकडाउन लागू करावा लागेल अशी चर्चा रंगली आहे. या संभावित लॉकडाउनच्या भीतीने कालपासून सुरु झालेली शेअर बाजारातील घसरण आजही कायम राहिली. आज सेन्सेक्स 243 अंकांनी घसरून 47 हजार 705 अंशांवर स्थिरावला. तर निफ्टी 63 अंकांनी घसरून 14 हजार 296 अंकांवर बंद झाला. आज सकाळी व्यवहार सुरु होताना बाजारात काही काळ तेजी दिसून आली. सेन्सेक्सने दिवसाच्या सत्रात 48 हजार 500 पर्यंत मजलही मारली होती. पण नंतर निर्देशांकांमध्ये सतत घसरण सुरुच राहिली. शेवटच्या अर्ध्या तासात निर्देशांक थोडेसे सावरले पण तरीही दिवसअखेरीस साधारण अर्धा टक्का घसरणीसह बाजार बंद झाला.

हेही वाचा: "लॉकडाउन संपू दे, मग देवेंद्र फडणवीसांना..."

निफ्टीच्या प्रमुख 50 समभागांपैकी 23 समभाग वाढ दाखवत तर 27 समभाग घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्सच्या मुख्य 30 समभागांपैकी 13 समभागांचे दर घसरले तर 17 समभागांचे दर वधारले. बजाज फिनसर्व्ह, डॉ. रेड्डीज, बजाज फायनान्स, बजाज ऑटो, महिंद्रा आणि महिंद्रा, मारुती या समभागांचे दर दोन ते चार टक्के वाढले. डॉ. रेड्डीज लॅब 25 जानेवारीनंतर आज पुन्हा पाच हजारच्या वर (5 हजार 153 रूपये) बंद झाला. तर अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक, एचडीएफसी हे समभाग तीन ते पाच टक्के घसरणीसह बंद झाले. इन्फोसिस (1 हजार 350 रूपये), आयटीसी यांचे दरही घसरले. रिलायन्सदेखील 1 हजार 900 च्या खाली घसरला होता, मात्र दिवसअखेर तो कसाबसा 1 हजार 900 चा स्तर (1हजार 901 रुपये) टिकवण्यात यशस्वी झाला.

हेही वाचा: तन्मय फडणवीस मुद्द्यावरून अमृता फडणवीस मैदानात; म्हणाल्या...

आजचे सोन्या-चांदीचे दर

24 कॅरेट सोने (10 ग्रॅम) - 45,980 रु.

चांदी (1 किलो) - 68,600 रु.

(संपादन- विराज भागवत)