ठाण्यात लॉकडाऊन वाढला; हॉटस्पॉट क्षेत्रात 31 जुलैपर्यंत निर्बंध कायम...

lockdown11
lockdown11

ठाणे :  वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. रविवारी (ता. 19) लॉकडाऊनची मुदत संपुष्टात येत आहे. त्यामुळे ठाणे शहरातील हॉटस्पॉट घोषित केलेल्या भागात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्यात येणार असून इतर भागात पूर्वी प्रमाणे लॉकडाऊनचे नियम लागू राहणार असल्याचे ठाणे महापालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

केंद्र आणि राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीन महिने लॉ़कडाऊन लागू केला होता. जून महिन्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणत दुकाने आणि बाजारपेठा पुन्हा सुरु झाल्या होत्या. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याचे कारण देत महापालिका प्रशासनाने 2 जुलैपासून संपूर्ण लॉकडाऊन लागू केला. या लॉकडाऊनची मुदत १२ जुलैला संपुष्टात येणार होती. मात्र, त्याच्या एक दिवस आधीच महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेत 19 जुलैपर्यंत तो कायम ठेवला. 

त्यात लॉकडाऊनमुळे दुकाने आणि उद्योग बंद असल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगत व्यापारी आणि उद्योजकांनी लॉकडाऊन मागे घेण्याची मागणी केली होती. तर, नागरिकांमधून लॉकडाऊनविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यानुसार केवळ हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू असणार आहे. तर अन्य भागात केवळ भाजी मंडई, बाजारपेठा आणि दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत सम-विषम पद्धतीने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
---
संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com