
डहाणू : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे, डहाणूच्या समुद्रात अडकून पडलेल्या खलाशांनी माजी आमदार पास्कल धनारे यांच्याकडे समुद्रात मरण्याआधी एकदा घरच्यांना भेटू द्या अशी आर्त हाक घातली आहे.
गुजरात मधील वेरावळ बंदरातून चार-पाच दिवसापूर्वी 5 बोटीतून आलेल्या 500 खलाशांना उतरविण्यास प्रशासनाने स्पष्ट नकार दिल्याने, डहाणू समुद्रात हे खलाशी बोटीवरच अडकून पडले आहेत. त्यांच्या बोटीवरील अन्नधान्य साठा,औषध संपले आहे. त्यामुळे त्यांच्यावर भूकबळी जाण्याची पाळी ओढवली आहे. त्यातच चार-पाच खलाशी आजाराशी झुंजत असून, त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. अशा परिस्थितीत हे खलाशी माजी आमदार पास्कल धनारे यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधून,आम्ही तडफडून मरण्यापूर्वी आमच्या कुटुंबाची भेटू द्या, त्यासाठी तरी आम्हाला मानवतेच्या दृष्टिकोनातून डहाणू बंदरात उतरविण्यास परवानगी देण्यात यावी, अशी आर्त हाक या खलाशांनी दिली आहे.
पाच बोटीतील 500 खलाशांकडील अन्नधान्य, पाणी, औषध, संपले असून, त्यांच्यावर उपासमारीने तडफडून मरण्याची वेळ आली आहे. सरकारने त्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून डहाणू बंदरात उतरविण्यास परवानगी देण्यात यावी,
- शशिकांत बारी, चेअरमन, आदर्श मच्छीमार सहकारी सोसायटी
डहाणू बंदरात उतरण्यासाठी समुद्रात उभ्या असलेल्या बोटीवरील खलाशाना उतरविण्यास,
सरकार परवानगी देणार नसेल तर, सरकारने त्यांच्या अन्नधान्य आणि औषधपाण्याची व्यवस्था करावी.
- पास्कल धनारे, माजी आमदार.
Lockdown: Meet the family before they die read full story
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.