ते हळूच झुडपात गेले आणि अनेक दिवसांचं पेंडिंग काम एकदाचं करून आले... 

ते हळूच झुडपात गेले आणि अनेक दिवसांचं पेंडिंग काम एकदाचं करून आले... 

ठाणे  - गेले महिनाभर लॉकडाऊन काळात सलूनची दुकाने बंद असल्याने घरातील पुरुष मंडळी वाढलेल्या दाढीवर आणि केसांवर हात फिरवून आणखी काही दिवस अजून, तसेही कुठे बाहेर जायचे आहे असा विचार करुन स्वतःचीच समजूत काढताना दिसत आहेत. तर काही मंडळींनी घरीच ट्रीमरच्या सहाय्याने केस पूर्ण भादरुन टाकली आहेत. परंतू काही असेही उत्साही आहेत की या लॉकडाऊन काळातही त्यांना आकर्षक असाच हेअरकट, क्लीन शेव्ह किंवा बिअर्डेड लूक बिघडवू द्यायचा नाही आहे, म्हणून त्यांनी नामी शक्कल लढवित झुडपात गेले आणि केस कर्तनकाराकडून दाढी डोकी करुन आले. 

लॉकडाऊन काळात सलूनची दुकानेही बंद असल्याने पुरुष मंडळींना दाढी आणि डोक्यावरील वाढलेले केस हैराण करीत आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने हे वाढलेले केस मेंन्टेन ठेवणं जड जातं.  परंतू आणखी काही दिवस, तसेही कुठे बाहेर जायचे आहे, घरातीलच लोक पहात आहेत असे स्वतःच्याच मनाची समजूत काढून अनेकजण वाढलेले केस घेऊन घरात शांत बसले आहेत. तर दुसरीकडे कलाकार, क्रिकेटपट्टू आपल्या पत्नींकडून हेअरकट करुन घेत असल्याचे व्हिडीओ व्हायरल होत असल्याने काहींनी तोच कित्ता गिरवित थोडे थोडे हेअर घरीच कट केले आहेत.

पूर्वीच्या काळी उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होतो म्हणून केस पूर्ण भादरुन टाकण्याकडे पुरुषांचा कल असायचा. आता केस कापण्यास केस कर्तनकार मिळत नसल्याने काहींनी घरीच ट्रिमरच्या सहाय्याने केस भादरुन टाकले आहेत. परंतू काही उत्साही तरुण मंडळीही असून त्यांना केस कर्तनकाराकडूनच त्यांचा हेअरकट व शेव्हींग करुन घ्यायची होती. परंतू जेथे तेथे पोलिसांचा असलेला कडक पहारा आणि बंद असलेली दुकाने यामुळे हा कार्यक्रम कोठे पार पाडता येईल या विचारात तरुण मंडळी होती.

अखेर सोसायट्यांच्या आजूबाजूच्या आवारातील झाडा झुडपांचा आधार त्यांना गवसला. सकाळी 11 वाजताच तिघांनी झूडपात प्रवेश केला आणि तेथे त्यांचे हेअर कटींग व दाढीला शेपमध्ये कटींग करणे सुरु झाले. एका मुलाचे झाल्यावर दुसऱ्याचे असे करत चार ते पाच मुलांनी झुडपात जाऊन दाढी डोकी करुन घेतली. आपल्या लूकमध्ये जराही बदल होऊ नये योग्य पद्धतीनेच हेअर कटींग व्हावी म्हणून त्या मुलांनी ही युक्ती लढवली. 

सुरुवातीला आजूबाजूच्या सोसायटीतील लोकांना ही मुले नक्की काय करत आहेत याचा अंदाज आला नसल्याने ते त्यांच्याकडे घरातून आश्चर्याने पहात होती. एक दोघांनी तर सोसायटीतून खाली उतरुन ते नक्की झुडपात काय करत आहेत हे पहाण्यास पुढे झाले. परंतू मुले हेअरकटींग व शेव्हींग करत असल्याचे समजताच त्यांनी तेथून काढता पाय घेतला व मुलांनाही मोकळीक मिळाली. त्यामुळे दोन तासात चार ते पाच मुलांनी न्हाव्याकडून आपली दाढी डोकी करुन ऐटीत निघून गेली.  

लॉकडाऊनमध्ये सलून बंद असल्याने न्हावी लोकांचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे काही न्हावी घरोघरी जाऊन काम आहे का विचारणा करीत आहेत, तर काही नागरिक स्वतः संपर्क साधून घरी बोलावून चार ते पाच जणांची दाढी डोकी बंद दाराआड करुन घेतात. असेच काहींनी झुडपांचा आधार घेतला असेल. परंतू काम मिळाले नाही तर घरची चूल पेटणार कशी असा प्रश्न असल्याने आज अनेक न्हावी धोका पत्करुन हे काम करीत असल्याचे केस कर्तनकार संतोष जाधव. 

for long pending shaving they went in bushes and sid hair cutting and shaving

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com