“बरं ते जॅकेट कायमचं उतरलं, की हा ‘लॉकडाउन लूक" आहे ?”

“बरं ते जॅकेट कायमचं उतरलं, की हा ‘लॉकडाउन लूक" आहे ?”

मुंबई : एकीकडे कोरोनानं संपूर्ण राज्यभरात थैमान घातलं आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा प्रश्न सरकारपुढे निर्माण झाला आहे. काल विरोधी पक्षनेते देवेंद्र  फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर उत्तर देताना एका युवासेनेच्या नेत्यानं फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

राजभवन आणि मंत्रालयातला संघर्ष वाढतच चालला आहे. कोरोनाच्या संकटात राज्य सरकारला स्थैर्याची गरज आहे. म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्याची शिफारस महाविकास आघाडीनं  राज्यपालांना केली आहे. यासंदर्भात महाविकास आघाडीतल्या मंत्र्यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. मात्र राज्यपालांनी तसं केलं नाही नाही तर घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतात.  

मात्र त्याआधी मंगळवारी दुपारी  देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यात त्यांनी राज्य सरकारला राज्यापोळणी जाब विचारावा अशी मागणी केली. तसंच राज्यात अघोषित आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण करुन पत्रकार आणि संपादकांमध्ये दहशत निर्माण केली जात आहे असा आरोपही फडणवीसांनी केला आहे.  हे सगळं लवकरात लवकर थांबवा अशी मागणी त्यांनी राज्यपालांकडे केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा नेते विनोद तावडे, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा हे  उपस्थित होते.    

मात्र यावर युवासेनेचे नेते वरूण सरदेसाई यांनी फडणवीसांचं नाव न घेता त्यांना सणसणीत टोला लगावलाय. “बरं ते जॅकेट कायमचं उतरलं आहे की हा ‘लॉकडाउन लूक’ आहे ?”,असा टोला वरुण सरदेसाई यांनी लगावला आहे. फडणवीस आपल्या जॅकेट घालण्याच्या शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र जेव्हापासून लॉकडाऊन  सुरु आहे त्यांच्या अंगात जॅकेट दिसलं नाहीये. त्यामुळे वरूण  सरदेसाई यांनी असा टोला फडणवीसांना लगावला आहे.

yuvasena leader varun sardesai taunts devendra fadanavis without taking his name 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com