चाक फिरेना, संसार चालेना.... वैतागलेल्या रिक्षाचालकांचं मुख्यमंत्र्यांकडे साकडं

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 मे 2020

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये ठाणे शहरातील सुमारे 75 हजार रिक्षा चालकांचा व्यवसाय बंद आहे. या रिक्षा चालकांना काहींनी मदत केली. पण अद्यापही रिक्षाचालक स्थिरस्थावर होऊ शकलेला नाही.

ठाणे : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये ठाणे शहरातील सुमारे 75 हजार रिक्षा चालकांचा व्यवसाय बंद आहे. या रिक्षा चालकांना काहींनी मदत केली. पण अद्यापही रिक्षाचालक स्थिरस्थावर होऊ शकलेला नाही. त्यामुळे ठाणे शहर रिक्षा - टॅक्सी चालक मालक कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन दिले आहे. या निवेदनाद्वारे या रिक्षा चालकांसाठी मदतीचा हात पुढे करावा , अशी मागणी करण्यात आली आहे.

मोठी बातमी सामनातून सरकारला थेट 'हा' सवाल, जनतेचा धीर सुटणार नाही याचीही काळजी घेण्याचा सल्ला

आजच्या घडीला दैनंदिन उत्पन्न असलेल्या रिक्षाचालक, घोडागाडी चालक, फेरीवाले, सलूनमध्ये काम करणारे कारागीर अशा अनेकांसमोर रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अनेकांच्या हातातील रोजगार गेला. त्यामुळे जगायचे कसे, खायचे काय? असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. ठाण्यातील रिक्षा चालकांचीही आता हीच अवस्था झाली आहे. रिक्षा दारात उभ्या आहेत, त्यांचे हप्ते फेडायचे आहेत, घरच्यांना दोन वेळचा घास द्यायचा आहे, हे सर्व कसे करायचे? अशा पेचात रिक्षाचालक सापडला आहे.  शहरात आजच्या घडीला 75 हजारांच्या आसपास रिक्षा चालक आहेत. त्यांच्यावर अवलंबून सुमारे तीन लाख नागरिक आहेत. या सर्वांचे पोट आता कसे भरायचे ? असा प्रश्न या रिक्षाचालकांसमोर आहे. 

महत्वाची बातमी : आजपासून सुरु झालेल्या स्पेशल ट्रेनचं वेळापत्रक खास तुमच्यासाठी..

मधल्या काळात काही दानशूर व्यक्तींनी रिक्षाचालकांना मदत केली खरी, मात्र ती देखील अपुरी पडली आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिले असून या निवेदनाद्वारे रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी काही कल्याणकारी योजना राबवावी, अशी मागणी केली आहे. तसेच आर्थिक मदतही करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. 

lockdown on rickshaw drivers,  Ask Chief Minister Uddhav Thackeray for help


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lockdown on rickshaw drivers,  Ask Chief Minister Uddhav Thackeray for help