esakal | लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम; ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट...
sakal

बोलून बातमी शोधा

corona free patients

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आले. त्यानंतर दोन ते अडीच महिन्याच्या कालावधी नंतर जून महिन्यात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली

लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम; ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

ठाणे : ठाणे जिल्ह्यात जुलै महिना उजाडताच कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणत वाढ होत असल्याचे दिसून आले. कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येवर प्रतिबंध यावा यासाठी जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर आणि मीरा भाईंदर या प्रमुख महापालिका क्षेत्रांसह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही लॉकडाऊन करण्यात आले. याचा सकारात्मक परिणाम म्हणून जुलै महिन्याच्या सुरुवातीला दोन हजारांच्या घरात पोहोचलेली बाधितांची संख्या पुन्हा एका हजाराच्या आसपास येवून पोहोचली आहे. त्यामुळे या लॉकडाऊनमुळे बाधितांच्या वाढत्या संख्येला काहीशा प्रमाणात अटकाव करण्यात यश आल्याचे दिसून येत आहे.

 ठाणे पालिकेने कोरोना नियंत्रणासाठी कसली कंबर! ॲानलाईन बेड अलोकेशन सिस्टम वेबलिंक सुरू

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आले. त्यानंतर दोन ते अडीच महिन्याच्या कालावधी नंतर जून महिन्यात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली. त्यानंतरही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. त्यावेळी 400 ते एक हजाराच्या आत होती. मात्र, जुलै महिन्यात टाळेबंदीत आणखी शिथिल करण्यात आल्याने रुग्णांच्या संख्या कमालीची वाढ होत असल्याचे दिसून आले. 

मास्क घातला नाही, गेल्या सहा दिवसात 'इतक्या' लोकांनी मोजले हजार रुपये

2 जुलै रोजी रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होवून एक हजाराच्या आसपास असलेली बाधितांची संख्या थेट 1 हजार 921 वर पोहोचली होती. तर, 3 जुलै रोजी या संख्येत वाढ होवून 2 हजार 027 इतकी झाली होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन तसेच महापालिका प्रशासनापुढील चिंता वाढली होती. त्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढत्या कोरोनाबाधित रुग्ण संख्येबाबत जिल्ह्यातील सर्व महापालिका आयुक्तांशी चर्चा करून अटकाव आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच त्यांची झाडाझडती देखील घेतली होती.

मिलिंद नार्वेकर यांची शिष्टाई यशस्वी, पारनेरच्या 'त्या' पाच नगरसेवकांची घरवापसी...

त्यानुसार जिल्ह्यातील सहा महानगर पालिकांनी त्यांच्या क्षेत्रात काही ठिकाणी 1 जुलै पासून तर, काही ठिकाणी 2 जुलैपासून ते 12 जुलैपर्यंत पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांव्यतिरिक्त अन्य एकही दुकान खुली ठेवण्यात येणारा नसल्याचे फर्मान पालिकांनी काढले आहे. त्यामुळे त्याचा काहीसा सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. 

'डॉ. बाबासाहेबांचे कार्य, विचारांवरील श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही' : अजित पवार

कल्याण-डोंबिवलीतील रुग्णांची संख्या आटोक्यात
ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात जुलै महिना उजाडताच रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्य्याचे पहायला मिळाले. जुलै महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाबाधित रुग्णांची संख्या थेट 500 ते 560 पर्यंत गेली होती. मात्र, करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम होवून ती संख्या 200 ते 300 च्या आसपास येवून पोहोचली आहे.  

जिल्ह्यातील जुलै महिन्यातील बाधित रुग्णांची संख्या 

तारीख   बाधित रुग्णाची संख्या 
1 जुलै          1325 
2 जुलै         1921
3 जुलै       2027
4 जुलै       1948
5 जुलै         1876
6 जुलै         1510
7 जुलै         1340
loading image