esakal | लॉकडाउनचं संकट: दागिने, हिरे व्यवसाय ठप्प

बोलून बातमी शोधा

gold-sona.jpg

व्यापारी हवालदिल झाले आहेत.

लॉकडाउनचं संकट: दागिने, हिरे व्यवसाय ठप्प
sakal_logo
By
कृष्णा जोशी

मुंबई: लॉकडाउनचे निर्बंध, कारागिरांचा अभाव व आता पुन्हा घोंगावणारे अनिश्चिततेचे वादळ यामुळे मुंबईतील सोन्याचांदीचे दागिने व हिरे व्यापाऱ्यांचा व्यवसाय ठप्प झाला असून हे वर्षही असेच फुकट जाणार का? या चिंतेमध्ये व्यापारी वर्ग आहे. गेल्यावर्षीच्या मार्चअखेरपासून लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर पाडवा-गणपती-दसरा-दिवाळी यापैकी बहुतेक सण वाया गेले. फेब्रुवारीत परिस्थिती सुधारत असल्याचे दिसत असताना, पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्याने दागिने व्यावसायिकांपुढे प्रश्न उभा राहिला आहे. 

पूर्वीच्या तुलनेत गेल्या वर्षभरात 40 ते 60 टक्के व्यवसाय झाला.  थांबलेली लग्नसराई जेव्हाकेव्हा जोमाने सुरु होईल, तेव्हाच व्यवसायात पुन्हा तेजी दिसेल.  पण अशा कोविडच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या लाटा आल्या व लॉकडाऊन होतच राहिला, तर परिस्थिती कठीण होईल, यावर सुवर्णकारांचे एकमत आहे. कारण सध्या महाराष्ट्रात कारागिरांचा तुटवडा आहे. 

मुंबईत 'वीकेंड लॉकडाऊन'मध्ये किती जणांवर झाली कारवाई?

झवेरी बाजारातील तसेच बीकेसीच्या डायमंड मार्केटमधील हिरे व्यापाऱ्यांचा व्यवसायही पूर्णपणे ठप्प आहे, असे हिरे दागिने निर्माण करणारे व्यापारी चंद्रशेखर शुक्ला यांनी सांगितले. मार्च मध्ये व्यवहार सुरु झाले मात्र आता पुन्हा निर्बंध आल्याने व्यापाऱ्यांचे हाल आहेत, असेही ते म्हणाले. नेहमीच्या तुलनेत गेला वर्षभर जेमतेम वीस ते तीस टक्के व्यवसाय झाला, असेही त्यांनी सांगितले. तर वर्षभर व्यवसाय जवळपास बंदच आहे, अजूनही व्यवसायाने जोर पकडला नाही असे सोन्याचे दागिने घडवणारे अजंता मॅन्युफॅक्चरर्सचे अतुल शहा म्हणाले. 

मुंबईकरांनो जरा जपून.... वाचा चिंता वाढवणारी बातमी

बंगाली कारागिरांचा तुटवडा आणि थांबलेली लग्नसराई यामुळे उत्पादन कमी आहे, असे पुरुषोत्तम काळे या सुवर्णव्यावसायिकांनी सांगितले. मागीलवर्षीच्या लॉकडाऊनमध्ये पश्चिम बंगालला गेलेले अर्धे मजूर परत आले, मात्र दिवाळीत आम्ही त्यांचा कामाचा रोजचा कोटा पूर्ण करू शकलो नाही, त्यामुळे पुन्हा त्यातील अर्धे मजूर परत गावी गेले. जून ते सप्टेंबर या काळातील आमचे दागिने प्रदर्शनांचे दोन हंगाम फुकट गेले.  गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पाडव्याची तयारी कमी आहे, आणि कारागीर नसल्याने अर्धेच उत्पादन होत आहे, असे पेडणेकर ज्वेलर्सचे आनंद पेडणेकर म्हणाले.