Loksabha 2019 : अंबानींचा देवरांना पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्‍ती असलेले रिलायन्स कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे दक्षिण मुंबईचे उमेदवार मिलिंद देवरा यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

मुंबई - देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्‍ती असलेले रिलायन्स कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे दक्षिण मुंबईचे उमेदवार मिलिंद देवरा यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. 

‘मिलिंद इज द मॅन फॉर साऊथ मुंबई’ अशा शब्दांत त्यांचे कौतुक करणारा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर त्यांनी टाकला असून, यामध्ये मुकेश अंबानींसह कोटक बॅंकेचे प्रमुख उदय कोटक यांचादेखील समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जवळचे समजले जाणाऱ्या मुकेश अंबानींनी काँग्रेसच्या उमेदवाराची पाठराखण केल्याने अनेकांच्या भुवया उंचाविल्या. दक्षिण मुंबईतील लहान-मोठ्या अनेक उद्योगांच्या असोसिएशननी मिलिंद देवरांना पाठिंबा दिला आहे. यामध्ये स्टेनलेस स्टील मर्चंट असोसिएशन भुलेश्‍वर, जेम्स अँड ज्वेलरी असोसिएशन ऑफ झवेरी बाझार, डायमंड मर्चंट फेडरेशन आदींनी जाहीर पाठिंबा दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Mukesh Ambani Milind Deora Politics