Jitendra Awhad : आम्ही घाबरणारे नसून आम्ही लढणारे आहोत

सुरेश म्हात्रे यांनी उमेदवारी जाहीर होताच, एमएमआरडीए प्रशासनाने केलेल्या कारवाईचा समाचार आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घेतला.
NCP Jitendra Awhad
NCP Jitendra Awhadesakal

ठाणे - सुरेश म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच, काही तासातच त्यांच्या गोडावूनवर कारवाई करण्यासाठी एमएमआरडीए प्रशासन कामाला लागते, हि आश्चर्याची बाब आहे. अशा पध्दतीने घाबरविण्याचा प्रयत्न केला जात असून आम्ही घाबरणारे नसून आम्ही लढणारे आहोत, असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

सुरेश म्हात्रे यांनी उमेदवारी जाहीर होताच, एमएमआरडीए प्रशासनाने केलेल्या कारवाईचा समाचार आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घेतला. लोकशाहीत निवडणुका जाहीर झाल्यानंतर निवडणुकींच्या कामाला लागतो. शासकीय यंत्रणांचा या काळात वापर कमी केला जातो.

मात्र भिवंडीतील उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्या गोडावून झालेली कारवाई ही दुर्देवी बाब असल्याचे मत आव्हाड यांनी व्यक्त केले. वास्तविक पाहता एमएमआरडीएला देखील माहिती आहे, या गोडावूनच्या बाबतीत म्हात्रे यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती मिळविली आहे. तरी देखील अशा पध्दतीने घाबरविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

स्वातंत्र्य काळातील जमिनींचे फेरफार कोणी कसे बदलले हे संपूर्ण भिवंडीकरांना माहिती असल्याचे सांगत, भाजपचे उमेदवार कपील पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे टिका केली. तुम्हाला तुमचा प्रभाव दिसू लागला असल्याने तुम्ही फक्त घाबरून, दम देऊन निवडणुका लढवू शकता हे आता स्पष्ट झाले असल्याचे देखील आव्हाड यांनी सांगितले. त्यामुळे अशी माणसे लोकसभेत निवडून जाणार असतील तर हे देशाचे दुर्देव असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, ठाणे लोकसभेच्या मुद्यावरुन आव्हाड यांना विचारले असता, प्रत्येकाला आपल्याला उमेदवारी मिळावी असे वाटत असेल तर त्यात गैर काय? प्रताप सरनाईक यांना उमेदवारी मिळावी अशी माझी मनापासून इच्छा असल्याचेही त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com