CM Eknath Shinde : त्यांच्यासोबत पाकिस्तानची बोली बोलणारे बसतात; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

आमचे विचार हे बाळासाहेबांचे विचार, आमची शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे. त्यांची विचारधारा जी आहे ती सावरकरांची बदनामी करणारी.
CM Eknath Shinde
CM Eknath Shindesakal
Updated on: 

डोंबिवली - आमचे विचार हे बाळासाहेबांचे विचार, आमची शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे. त्यांची विचारधारा जी आहे ती सावरकरांची बदनामी करणारी. त्यांच्यासोबत काँग्रेस जे पाकिस्तानची बोली बोलतात ते बसतात असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी उल्हासनगर येथील एका सभेमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना शिंदे गट व ठाकरे गट एकत्र येतील असं विधान केलं होतं. याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचे विचार बाळासाहेबांचे विचार, आमची शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे. शिवसेना-भाजप वैचारिक भूमिका आम्ही घेतलेले आहे.

त्या वैचारिक भूमिकेनुसार बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही सरकार स्थापन केलं. आणि म्हणून हे सरकार जे आहे सर्वसामान्यांच्या मनातल्या सरकार आहे. आमची विचारधारा ही बाळासाहेबांच्या विचारांची आहे. त्यांची विचारधारा जी आहे ती सावरकरांची बदनामी त्यांना चालते, औरंगजेबाची बाजू ते घेतात. त्यांच्यासोबत काँग्रेसचे जे पाकिस्तानी बोली बोलतात ते बसतात असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मुंबईतील नरेंद्र मोदी यांचे उद्याची सभा ऐकण्यासाठी लाखो लोक येतील - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईतील महायुतीचे सभा बाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी येणार म्हणजे तयारी करावी लागत नाही.जनता स्वतः त्यांच्यासाठी अतुरलेली असते. त्यांचे विचार ऐकण्यासाठी त्यांना बघायला आतुरलेली असते. देशात नव्हे तर जगातले लोकप्रिय नेते म्हणून त्यांची ओळख आहे. उद्या देखील सगळे ऐकायला लाखो लोक येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Uddhav Thackeray Eknath Shinde
Eknath Shinde Dare Village :  गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा
Eknath Shinde Arrives at Dare Village
Eknath Shinde reached Delhi and held discussions with lawyers and legal experts ahead of the Supreme Court hearing on the Shiv Sena party and Bow and Arrow symbol dispute.
Marathi News Esakal
www.esakal.com