

Palghar railway station Long pedestrian flyover
ESakal
पालघर : पालघर रेल्वेस्थानकावर डहाणू आणि विरार बाजूकडे बांधलेले लांबलचक पादचारी उड्डाणपूल प्रवाशांसह पूर्व-पश्चिमेला ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. उड्डाणपुलांची चढती बाजू लांबलचक असल्याने पूल चढण्यासाठी नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, रुग्ण, विद्यार्थ्यांना कसरत करावी लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.