esakal | सर्वात मोठी ब्रेकिंग - मुंबईत १५ मे पर्यंत कोरोना रुग्णांचा आकडा साडे सहा लाखांवर जाण्याची भीती
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वात मोठी ब्रेकिंग - मुंबईत १५ मे पर्यंत कोरोना रुग्णांचा आकडा साडे सहा लाखांवर जाण्याची भीती

मुंबई - गेल्या काही दिवसात मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळतोय. काही जिल्हे ग्रीन झोनमध्ये गेले असले तरीही मुंबई वरील कोरोनाचा रंग आणखी गडद लाल होताना पाहायला मिळतोय. यातच मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी आता समोर येतेय. कालच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत एक महत्त्वाची माहिती दिली होती. यामध्ये मुंबईत ३० एप्रिल ते १५ मे दरम्यान एक मोठा स्पाईक दिसून येईल अशी माहिती दिली होती. या संदर्भातील एक अहवाल आता समोर आलाय यामध्ये ३० एप्रिल पर्यंत मुंबईत तब्बल ४२ हजार ६०४ जणांना कोरोनाची लागण होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सर्वात मोठी ब्रेकिंग - मुंबईत १५ मे पर्यंत कोरोना रुग्णांचा आकडा साडे सहा लाखांवर जाण्याची भीती

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - गेल्या काही दिवसात मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळतोय. काही जिल्हे ग्रीन झोनमध्ये गेले असले तरीही मुंबई वरील कोरोनाचा रंग आणखी गडद लाल होताना पाहायला मिळतोय. यातच मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी आता समोर येतेय.

कालच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत एक महत्त्वाची माहिती दिली होती. यामध्ये मुंबईत ३० एप्रिल ते १५ मे दरम्यान एक मोठा स्पाईक दिसून येईल अशी माहिती दिली होती. या संदर्भातील एक अहवाल आता समोर आलाय यामध्ये ३० एप्रिल पर्यंत मुंबईत तब्बल ४२ हजार ६०४ जणांना कोरोनाची लागण होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे १५ मे पर्यंत मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा हा साडे सहा लाखांपर्यंत जाऊ शकतो, अशी देखील शक्यता या अहवालात नमूद करण्यात आलेली आहे. 

मोठी बातमी - कोरोनामुळे शरीराचे कोण-कोणते भाग होऊ शकतात निकामी, जाणून घ्या
 

केंद्राच्या आरोग्य विभागाने दिलेली संभाव्य आकडेवारी : 

  • ३० एप्रिल २०२० - मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या ४२ हजार ६०४ वर जाऊ शकतो
  • १५ मे २०२० - मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या सहा लाख ५६ हजार ४०७ वर जाऊ शकते. 
  • ३० एप्रिल पर्यंत ऑक्सिजनशिवाय विलगीकरण करण्यात येणारे  ३० हजार ४८१ बेट्स कमी पडू शकतात 
  • १५ मे पपर्यंत ऑक्सिजनशिवाय विलगीकरण करण्यात येणारे ४ लाख ८२ हजार ३८५ बेट्स कमी पडू शकतात 
  • ३० एप्रिल पर्यंत ऑक्सिजनसह विलगीकरण करण्यात येणारे ५ हजार ४६६ बेट्स कमी पडू शकतात 
  • १५ मे पपर्यंत ऑक्सिजनशिवाय विलगीकरण करण्यात येणारे ८४ हजार ९३१ बेट्स कमी पडू शकतात .
  • ३० एप्रिल पर्यंत १ हजार २०० ICU बेड्सची कमतरता भासू शकते 
  • १५ मे पपर्यंत २७ हजार ६८८ ICU बेड्सची कमतरता भासू शकते 
  • ३० एप्रिल पर्यंत मुंबईत ३९२ व्हेन्टिलेटर्स कमी पडू शकतात तर १५ मी पर्यंत १३ हजार ६३६ बेड्स कमी पडू शकतात 

मन सुन्न होईल ! मुलगा आयलंडमध्ये, इथे बाबा वारले; शेवटी उरला 'हा' एकाच पर्याय, आता बाराव्या साठी तरी...

प्रत्येक देशात कोरोना रुग्णांचा आकडा कसा वाढला याचं अध्ययन करण्यात आलेलं. विविध स्टडी ग्रुप हे अध्ययन करत असतात. याच पार्श्वभूमीवर केंद्राकडून देखील एक अध्ययन करण्यात आलं. यानुसार समोर येणारी आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे. अर्थात ही आकडेवारी म्हणजे केवळ शक्यता आहे, खरंच असं होईल की नाही यावर आता कुणीच काही सांगू शकत नाही. केंद्राने या आकडेवारीचं अध्ययन करून ही आकडेवारी राज्य सरकारला दिली आहे. काल केंद्रीय पथक आणि मुख्यमंत्री तसंच आरोग्य मंत्र्यांची एक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा मिटिंग झाली यामध्ये ही आकडेवारी राज्याला देण्यात आली आहे. 

कोरोना पॉझिटिव्ह मातेने दिला निगेटिव्ह बाळाला जन्म, स्तनपानाबद्दल WHO म्हणतंय..

केंद्राने आणखी काय निर्देश दिलेत : 

क्वारंटाईनची संख्या वाढावा, सध्या मुंबईत असलेल्या बेड्सची संख्या कमी आहे. अनुमानित आकडेवारीप्रमाणे मुंबईतील कोरोना रुग्णाचा आकडा वाढला तर मुंबईत साडे चार लाख बेड्स कमी पडू शकतात, या बेड्ससाठी ऑक्सिजनची देखील कमातरता भासेल. मुंबईतील वरळी, धारावी, अंधेरी, नागपाडा या भागात रुग्णांची संख्या वाढू शकते, असं केंद्रीय पथकाने सांगितलं. आज धारावीत केंद्रीय आरोग्य पथकाने पाहणी केली. यामध्ये देखील क्वारंटाईनची व्यवस्था वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याचसोबत टेस्टिंग वाढवण्याच्या सूचना देखील केंद्राचे आरोग्य पथकाकडून देण्यात आल्यात.    

दरम्यान नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही कारण हे केळवा ठोकताळे आहेत. मात्र खबरदारी म्हणून तोंडावर मास्क लावणं हात वारंवार धुणे आणि घराबाहेर न जाता आपण मुंबईवर संकट रोखू शकतो. 

mumbai covid 19 count may above six and half lacs a report by central health department of india    

loading image