डोंबिवलीत ‘गुडविन’च्या मालकांविरोधात लूक आऊट नोटीस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

मुंबई : गुडविन ज्वेलर्सद्वारे गुंतवणूकदारांच्या झालेल्या फसवणुकीचा गुन्हा ठाण्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. आतापर्यंत ६९ गुंतवणूकदारांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून फसवणुकीचा आकडा तीन कोटी ८७ लाखांवर पोहोचला आहे. 

पोलिसांकडे आलेल्या तक्रारीनंतर डोंबिवलीतील ‘गुडविन’च्या पेढीला सील ठोकण्यात आले आहे. दुकानमालक सुनीलकुमार, सुधेशकुमार आणि व्यवस्थापक मनीष कुंडी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीसही काढण्यात आली आहे. 

तक्रारदारांना आपली तक्रार देण्यासाठी ठाण्यास जावे लागणार आहे. मात्र सामान्य नागरिकांचा विचार करून फसवणूक झालेल्यांना रामनगर पोलिस ठाण्यात एक खिडकी योजनेसारखी सवलत देऊन गुन्हे दाखल करण्याची मुभा दिली जावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

गुडविन ज्वेलर्सच्या विविध शहरांत ३९ शाखा आहेत. डोंबिवलीच्या शाखेतील कर्मचारी प्रदीप गुप्ता, प्रणाली जाधव, मुनील अब्दुल आदींसह सुनीलकुमार मोहनन अक्काकरण आणि त्याचा भाऊ सुधेशकुमार व व्यवस्थापक मनीष कुंडी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.  
- सुरेश आहेर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Look out notice against 'Goodwin jwellers' owners in Dombivli