खराब हवामानामुळे मच्छीमारांचे पुन्हा 25 कोटींचे नुकसान

अलिबाग : खराब हवामानामुळे कोळी बांधवांनी आपल्या बोटी किनार्‍यावर लावल्या असून, मासेमारीसाठी वापरली जाणारी जाळी शिवण्याचे काम सुरू केले आहे.
अलिबाग : खराब हवामानामुळे कोळी बांधवांनी आपल्या बोटी किनार्‍यावर लावल्या असून, मासेमारीसाठी वापरली जाणारी जाळी शिवण्याचे काम सुरू केले आहे.

रोहा : काही दिवसांपासून खोल समुद्रात हवामान खराब आहे. त्यातच गुरुवार (ता. २४) पासून वादळाचा इशारा हवामान विभागाने दिला असल्याने रायगड जिल्ह्यातील बहुतांश मच्छीमार बंदराकडे येत आहेत. या अस्मानी संकटामुळे मच्छीमारांचे सुमारे २५ कोटींचे नुकसान होणार आहे. 

मासेमारी बंदी संपुष्टात आल्यानंतर जिल्ह्यातील मच्छीमारांनी जोशात सुरुवात केली होती; परंतु त्यांचा हा फार काळ टिकला नाही. खराब हवामानामुळे खोल समुद्रातून त्यांना किनाऱ्यावर माघारी यावे लागले होते. १९ जुलैला तर बहुतांश मच्छीमार बंदरात दाखल झाले होते. त्या वेळी तब्बल २५ कोटींचे नुकसान झाले होते. 

खराब हवामानामुळे मासेमारी करणाऱ्यांना ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात अवघी १५ दिवस मासेमारी शक्‍य झाली. ऑक्‍टोबरमध्ये १५ ते २० दिवसानंतर पुन्हा खराब हवामानाचा इशारा देण्यात आला असल्याने मच्छीमार हताश आहेत, अशी माहिती बोर्ली मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष कैलास कोटकर यांनी दिली. 

खलाशांचे पगार, खानावळी, बोटीचे हप्ते आणि व्यापाऱ्यांची उचल कशी फेडावी, याचीच चिंता मच्छीमारांना आहे. ४ ते ५ वर्षांपासून दिवाळीनंतर ३ महिने जिल्ह्याच्या समुद्रकिनारी जेलिफिशचा उपद्रव सुरू होतो. त्यामुळे ही धास्तीही आहे, असे मच्छीमार सांगतात. 

जिल्हाभर सुमारे तीन हजार मच्छीमार बोटी आहेत. त्यामुळे त्यांचे या १५ दिवसांत २५ कोटींचे नुकसान झाले झाले, असे श्रीवर्धन मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र वाघे यांनी सांगितले. परिस्थिती लवकर सुधारली नाही, तर मासेमारी व्यवसायाचे दिवाळे निघण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. 

यंदा जूनपासून सतत खराब हवामान आहे. वादळानेही वारंवार दणका दिला आहे. जागतिक तापमानात वाढ झाल्याने हे संकट येत आहे. आता तरी जागे होण्याची आवश्‍यकता आहे. 
- गणेश नाखवा, अध्यक्ष, ऑल इंडिया पर्ससीननेट असोसिएशन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com