व्यायामशाळा चालकांची आर्थिक कसरत; नागरिकांनी फिरवली पाठ

प्रसाद जोशी
Monday, 2 November 2020

राज्य सरकारने विविध नियम घालून व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी दिली. व्यायामशाळा सुरू झाल्याने आपला आर्थिक प्रश्‍न सुटेल असे व्यायामशाळा चालकांना वाटले; मात्र कोरोनामुळे नागरिकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने व्यायामशाळा चालकांची आर्थिक कोंडी झाली आहे.

वसई ः राज्य सरकारने विविध नियम घालून व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी दिली. व्यायामशाळा सुरू झाल्याने आपला आर्थिक प्रश्‍न सुटेल असे व्यायामशाळा चालकांना वाटले; मात्र कोरोनामुळे नागरिकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने व्यायामशाळा चालकांची आर्थिक कोंडी झाली आहे. आठ महिन्यांपासून बंद असलेल्या व्यायामशाळेतील साहित्य दुरुस्त करण्यात आधीच भरसाट खर्च झाला आहे; मात्र नागिरकांकडून अल्प प्रतिसाद मिळत असल्याने हा खर्चदेखील वाया जातो की काय अशी भीती व्यायामशाळा चालक व्यक्त करत आहेत. 

बांग्लादेशी घुसखोरांना एमआयएम आमदारांचे पाठबळ? भाजपकडून अटकेची मागणी

वसई तालुक्‍यात एकूण 250 हून अधिक छोट्या व मोठ्या व्यायामशाळा आहेत. सरकारने परवानगी दिल्यानंतर आठ महिने धूळ खात पडलेले साहित्य दुरुस्ती, रंगरंगोटी यासाठी छोट्या 15 ते 20 हजार; तर मोठ्या व्यायामशाळेला 50 हजारहून अधिक खर्च झाला आहे. व्यायामशाळेत येणाऱ्या नागरिकांनी आगोदर वर्षभराची प्रवेश फी भरली असल्याने तेच येत आहेत. नवीन प्रवेश कमी झाले आहेत. त्यामुळे खेळता पैसा नाही. प्रोटीन व अन्य खर्च तसेच 10 नागरिकांमागे 1 प्रशिक्षक नेमला जातो. कोरोनात हे प्रशिक्षक घरीच असल्याने त्यांना आर्थिक चणचण भासली असून व्यायामशाळेत प्रशिक्षण देण्यासाठी येणारे आगाऊ पैसे मिळावेत अशी मागणी करत आहेत.

 "एवढ्या जणांना खंडणीसाठी धमकावलयं, आता आठवतही नाही"

त्यामुळे चालकांच्या समोर हा प्रश्‍नदेखील बिकट झाला आहे. व्यायामशाळा सुरू झाल्याने भाडेतत्त्वावर असलेल्या ठिकाणी मालकाकडून भाड्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे व्यायामशाळा चालकांकडून सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी करण्यात येत आहे. 

 

 

पालघर जिल्ह्यात 450 हून अधिक जीम आहेत. वसई त्यातील निम्म्याहून अधिक वसईत आहेत. त्या सुरू झाल्या असल्या तरी कोरोनाचे नियम पाहता मर्यादित संख्या, जिमचा खर्च, भाडे, प्रशिक्षक आणि इतर खर्च जास्त आहे. नव्याने प्रवेश कमी असून शासनाने ज्याप्रकारे व्यापारी, दुकानदार वर्गाला मदतीचा हात दिला, तशी आर्थिक मदत व्यायामशाळा चालकांनादेखील मिळावी. 
- प्रताप पुजारी, कार्याध्यक्ष, पालघर जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशन. 

मी मुंबई श्री चा मानकरी ठरलो होतो. मला तेव्हा एक लाख पारितोषिकदेखील मिळाले. शरीरसौष्ठव स्पर्धेत पैशांच्या रूपाने बक्षीस मिळत असते, परंतु हे वर्ष असेच गेले आहे. 
- योगेश मेहेर, रानगाव, वसई 

 

 

 

Loss of gym owner in Vasai
( संपादन ः रोशन मोरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loss of gym owner in Vasai