बांग्लादेशी घुसखोरांना एमआयएम आमदारांचे पाठबळ? भाजपकडून अटकेची मागणी

कृष्ण जोशी
Monday, 2 November 2020

बांग्लादेशी नागरिकांना मुंबईत आल्यानंतर त्यांचे बनावट आधारकार्ड, पासपोर्ट बनवून देणाऱ्या टोळीला मुंबई पोलीसांनी नुकतीच अटक केली. भारतीय नागरिकत्व मिळवून देणाऱ्या या टोळीकडे एमआयएमच्या दोन आमदारांचे लेटरहेड मिळाल्याने त्यांनाही अटक करण्यात यावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

मुंबई : बांग्लादेशी नागरिकांना मुंबईत आल्यानंतर त्यांचे बनावट आधारकार्ड, पासपोर्ट बनवून देणाऱ्या टोळीला मुंबई पोलीसांनी नुकतीच अटक केली. भारतीय नागरिकत्व मिळवून देणाऱ्या या टोळीकडे एमआयएमच्या दोन आमदारांचे लेटरहेड मिळाल्याने त्यांनाही अटक करण्यात यावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

पैशांसाठी चक्क प्रियकरालाच पळविले, प्रेयसीसह सात जणांना अटक

बांग्लादेशी नागरिकांना बेकायदेशीररित्या भारताचे नागरिकत्व मिळवून देणाऱ्या एका टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एमआयएमच्या दोन आमदारांची सही असलेली लेटरहेड जप्त करण्यात आली. त्यामुळे कायमच बेकायदा कृत्ये करणाऱ्या या पक्षाचा देशद्रोही चेहरा पुन्हा एकदा सर्वांसमोर आला असल्याची टीकाही भातखळकर यांनी यावेळी केली आहे. बांग्लादेशी घुसखोरांना भारतीय नागरिकत्व देण्याच्या या कटात आमदार मुफ्ती मुहम्मद इस्माईल अब्दुल खलील आणि आमदार शेख आसिफ शेख रशीद यांचाही हात असेल तर त्यांना तत्काळ अटक करा, अशी मागणीही भातखळकर यांनी केली. या टोळीने संबंधित आमदारांच्या लेटरहेडचा वापर करून मुंबईसह, नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबादसह भारतातील विविध शहरांमध्ये बांग्लादेशींना भारतीय नागरिकत्व मिळवून देण्याकरिता बनावट सरकारी दस्तावेज तयार केल्याचे आढळून आले. त्यांच्याकडे एमआयएमच्या या आमदारांची कोरी लेटरहेड देखील मिळाली आहेत. हा अतिशय घातक व धोकादायक प्रकार असून, भारताचा बांग्लादेश बनवण्याचा प्रयत्न आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) द्यावा, अशी मागणीही भातखळकर यांनी केली आहे. 

BMC कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी! महापौरांनी जाहीर केला दिवाळी बोनस

मतदार वाढविण्यासाठीची मोहिम? 
वंदे मातरमला विरोध, काश्‍मीरचे कलम 370 हटवण्याला विरोध, नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध, एनआरसीला विरोध असे उपद्‌व्याप असुद्दीन ओवैसी व त्यांचा पक्ष नेहमीच करतो. आता त्यांच्या पक्षाने आपले मतदार वाढविण्यासाठी बांग्लादेशींना बेकायदेशीररित्या भारताचे नागरिकत्व देण्याची मोहीम हाती घेतली आहे काय? असा प्रश्नही भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. 

'लेपर्ड कॉलर प्रोजेक्ट'; आता बिबट्यांच्या प्रत्येक हालचालींवर राहील बारीक नजर

अटक झालेल्या टोळीने ज्याप्रमाणे आधारकार्ड व अन्य बनावट कागदपत्रे बनविली तशीच त्यांनी बनावट लेडरहेड देखील बनविली असावीत. असा संशय आहे. कोरी लेटरहेड कोणालाही दिली नाहीत, जेव्हा कोणाला लेटरहेडवर पत्र देतो, तेव्हा त्याची साक्षांकित प्रत नोंद म्हणून माझ्याजवळ ठेवतो. याप्रकरणात पोलिसांनी दोषींवर जरूर कठोर कारवाई करावी. 
- मौलाना मुफ्ती मोहमद इस्माईल, आमदार, एमआयएम, मालेगाव

---------------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MIM MLAs support Bangladeshi infiltrators? BJP demands arrest