
Mhada House
Esakal
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, वसई (जि. पालघर) येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ५३५४ सदनिका ७७ भूखंड विक्रीकरिताची संगणकीय लॉटरी उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवार ११ ऑक्टोबर काढली जाणार आहे.