कल्याण पूर्वमध्ये कमी दाबाने पाणी येणार

रविंद्र खरात
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

पुढील 2 ते 3 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरून पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन कल्याण पूर्व पालिका पाणी पुरवठा विभाग उप अभियंता अशोक घोडे यांनी केले आहे .

कल्याण : उल्हास नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. तसेच यात कचरा आल्याने तो साफ करण्याचे काम हाती घेतले अाहे. त्यामुळे कल्याण पूर्वमध्ये आगामी दोन ते तीन दिवस पाणी कमी दाबाने येणार असून नागरिकांनी पालिका सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कल्याण पूर्व सहित पालिका हद्दीत उल्हास नदी मधून पाणी उचलून ते पुरवठा केला जातो. सध्या उल्हासनदीच्या पात्रातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे नदीपात्रात कचरा आल्याने मोहने उदनचन केंद्रातून पुरेसा पाणी उचलण्यास अडथळा निर्माण होत आहे. तो कचरा साफ करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार पुढील 2 ते 3 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरून पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन कल्याण पूर्व पालिका पाणी पुरवठा विभाग उप अभियंता अशोक घोडे यांनी केले आहे .

Web Title: Low pressure prevents water coming in Kalyan East