निवडणूक कर्मचाऱ्यांना 'काय' खायला लागतंय बघा..

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

  • निवडणूक कर्मचाऱ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण
  • कल्याण ग्रामीण मधील मतदान केंद्र क्रमांक 144 वरील प्रकार

कल्याण, ता. 21 : राज्यभरात आज मतदान प्रक्रिया पार पडत असून वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर हजारो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण खाऊन काम करावं लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याण ग्रामीण मधील मतदान केंद्र क्रमांक 144 मध्ये अश्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

कल्याण ग्रामीण मध्ये अडीच हजाराहून अधिक कर्मचारी-अधिकारी निवडणुकीच्या कामासाठी जुंपण्यात आले आहेत.रविवार सकाळ पासून हे सर्व कर्मचारी आपापल्या केंद्रावर रुजू झाले आहेत.दुपारी जेव ण मिळालं मात्र रात्री जेवण आलंच नाही.सोमवारी सकाळी ही नाष्टा मिळाला नाही.दुपारी मिळालं ते निकृष्ट दर्जाचे जेवण. जेवणामध्ये दोन सुकलेल्या चपात्या,कडक ठेपला आणि बुरशी लागलेलं लोणचं. हे जेवण कर्मचाऱ्यांच्या गळ्याखाली उतरलच नाही.कर्मचाऱ्यांना हे जेवण न खाताच फेकून द्यावं लागलं.

 

याबाबत इथल्या कर्मचाऱ्यांनी हा प्रकार आपल्या वरिष्ठांच्या लक्षात आणून द्यायचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपायोग झाला नाही.यामुळे उपाशी राहून या कर्मचाऱ्यांना आपलं कर्तव्य पार पाडावं लागतंय.मात्र निकृष्ट दर्जाचं जेवण खाऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर याला जबाबदार कोण असा या कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे.ठेकेदाराने पुरवलेल्या जेवणाचा दर्जा तपासण आवश्यक असून निकृष्ट जेवण देणाऱ्या ठेजेदारावर कारवाईची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

WebTitle : low quality food served to election duty workers in kalyan 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: low quality food served to election duty workers in kalyan