किमान तापमानातही वाढ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मार्च 2017

मुंबई - उन्हाचे न सोसणारे चटके राज्यभर जाणवू लागले आहेत. मार्चच्या अखेरीस दिवसातील कमाल तापमान असह्य होऊ लागले असताना आता किमान तापमानही वाढू लागले आहे. 

मुंबई - उन्हाचे न सोसणारे चटके राज्यभर जाणवू लागले आहेत. मार्चच्या अखेरीस दिवसातील कमाल तापमान असह्य होऊ लागले असताना आता किमान तापमानही वाढू लागले आहे. 

राज्यातील बहुतांश भागांतील किमान तापमान 30 अंशाजवळ पोहचल्याने उन्हाचा दाह वाढण्यास सुरुवात होईल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. विदर्भातील बहुतांश भागांत चाळिशीपार गेलेल्या उकाड्याने अंगाची लाहीलाही झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा 40 अंशावर तर कोकणातील बऱ्याच भागांत कमाल पारा 35 अंशावर पोहचला आहे. दोन दिवसांत किमान तापमानात होणारी वाढ लक्षात घेता किमान पाराही 30 अंशापर्यंत जाण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. एप्रिलच्या मध्यावर ही वाढ होईल, असा प्राथमिक अंदाज आहे. तापमानातील सततची वाढ पाहता उन्हाळा जास्त तापदायक ठरणार, असेही सांगण्यात आले. 

मुंबईत सोमवारी (ता. 27) कमाल तापमान 35 अंशावर येईल, तर किमान तापमानही सरासरीपेक्षा एक-दोन अंशाने अधिक राहील. केंद्रीय वेधशाळेच्या अंदाजानुसार, सोमवारी मुंबईत तापमान वाढण्याची शक्‍यता आहे. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने कमाल तापमान 35 अंशावर राहील, असा अंदाज व्यक्त केला असला, तरी केंद्रीय वेधशाळेच्या अंदाजानुसार पारा 37 अंशावरही जाऊ शकतो. 

Web Title: Low temperatures increase