Mumbai Crime: जागेच्या वादातून प्रवाशाला मारहाण, दहा लाखांच्या दागिन्यांसह रोकड लंपास; २५ दिवसांनी तक्रार

LTT-Banaras Express Theft Case: एलटीटी-बनारस एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशाच्या बॅगेतील १० लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे.
crime news

crime news

Sakal
Updated on

मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनसहून बनारसकडे जाणाऱ्या एलटीटी-बनारस एक्स्प्रेसमध्ये सीटच्या कारणावरून झालेल्या वादानंतर प्रवाशाच्या बॅगेतील १०.५३ लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तब्बल २५ दिवसांनी १९ मे रोजी एलटीटी रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, तीन अज्ञात प्रवाशांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com