मुंबईतील तिन्ही गायी लम्पी मुक्त! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cow Lumpy skin disease

मुंबईत लम्पी विषाणुचा शिरकाव झाल्यानंतर तीन गायींना लम्पीची लागण झाली होती. मात्र योग्य उपचार पद्धतीमुळे तिन्ही गायी लम्पी मुक्त झाल्या आहेत.

मुंबईतील तिन्ही गायी लम्पी मुक्त!

मुंबई - मुंबईत लम्पी विषाणुचा शिरकाव झाल्यानंतर तीन गायींना लम्पीची लागण झाली होती. मात्र योग्य उपचार पद्धतीमुळे तिन्ही गायी लम्पी मुक्त झाल्या आहेत. तर आतापर्यंत ३,२२६ पैकी ३,२०६ गायींचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. शैलेश पेठे यांनी दिली. दरम्यान, लम्पी चर्मरोग हा केवळ गायींना होत असून आजपर्यंत म्हैस वर्गीय प्राण्यांमध्ये हा रोग आढळून आलेला नाही. हा रोग प्राण्यांपासून मानवास संक्रमित होत नसल्याने सदर रोग  होण्याची भीती नसल्याचे पेठे यांनी सांगितले.

आरे दुग्ध वसाहतीतील सर्व गोवर्गीय जनावरांचे लम्पी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आलेले असून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गोशाळा व गोठ्यांमधील गोवर्गीय जनावरांचे लसीकरण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने पूर्ण केलेले आहे. मागील पशुगणनेनुसार मुंबई शहरात एकूण ३,२२६ गोवर्गीय जनावरे असून ३,२०६ जनावरांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. त्यामुळे मुंबई शहरातील जवळपास सर्व गोवर्गीय जनावरांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. मात्र अजूनही पशु पाळणाऱयांची जनावरे लसीकरण करण्याची राहून गेली असल्यास त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आपत्कालीन संपर्क क्रमांक १९१६, ०२२२५५६३२८४, ०२२२५५६३२८५ व राज्य शासनाचा पशुवैद्यकीय सेवा संपर्क क्रमांक १९६२ यावर संपर्क साधावा असेही आवाहन डॉ. शैलेश पेठे यांनी केले आहे.

टॅग्स :MumbaiCowDisease