

Lunar Eclipse Mumbai Temples Closed
ESakal
२०२६ या वर्षातील पहिले पूर्ण चंद्रग्रहण मंगळवार, ३ मार्च रोजी होणार आहे. ज्याचा मुंबईतील प्रसिद्ध मंदिरांच्या वेळेवर मोठा परिणाम होईल. धार्मिक श्रद्धा आणि सुतक काळातील कठोर नियमांमुळे दक्षिण मुंबईतील कुलदेवी मुंबा देवी ते प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंद ठेवण्यात येतील. यामुळे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनी वेळ बघून मंदिरात जाण्याचे आवाहन केले आहे.