भारतात फुप्फुसाचा कर्करोग बळावतोय; पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण 32 टक्के

भाग्यश्री भुवड
Sunday, 29 November 2020

फुप्फुसांचा कर्करोग एक विनाशकारी आजार आहे. सर्वाधिक प्रमाणात आढळून येणाऱ्या कर्करोगांपैकी तो एक आजार आहे. जगभरात फप्फुसाच्या कर्करोगामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. पुरुषांमध्ये सर्वात जास्त प्रमाण फुप्फुसांच्या कर्करोगाचे असते. महिलांना होणाऱ्या कर्करोगामध्ये त्याचा क्रमांक तिसरा आहे.

मुंबई : फुप्फुसांचा कर्करोग एक विनाशकारी आजार आहे. सर्वाधिक प्रमाणात आढळून येणाऱ्या कर्करोगांपैकी तो एक आजार आहे. जगभरात फप्फुसाच्या कर्करोगामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. पुरुषांमध्ये सर्वात जास्त प्रमाण फुप्फुसांच्या कर्करोगाचे असते. महिलांना होणाऱ्या कर्करोगामध्ये त्याचा क्रमांक तिसरा आहे. 

अँटीबॉडीज चाचणीत 75 टक्के पॉझिटिव्ह; कफ परेड झोपडपट्टीतील सिरो सर्वेक्षणातून उघड

फुप्फुसाच्या कर्करोगामुळे मृत्यू होणाऱ्या पुरुषांचे प्रमाण 32 टक्के आहे. महिलांमध्ये हेच प्रमाण 20 टक्के आहे. फुप्फुसाच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण प्रोस्टेट ग्रंथीच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूपेक्षा तीन पटींनी जास्त आहे. महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूपेक्षा ते जवळपास दुप्पट आहे. दरवर्षी आतडे, स्तन आणि प्रोस्टेट यांच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येची बेरीज केली तरी फुप्फुसांच्या कर्करोगामुळे होणारे मृत्यू जास्त असल्याचे आकडेवारी सांगते. भारतात फुप्फुसांच्या कर्करोगाच्या रुग्णांचे प्रमाण जवळपास 7 टक्के आहे. कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये फुप्फुसांच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जवळपास 9 टक्के आहे. 

अतिदुर्गम भागातील गर्भवतींना "माहेरघरात' आणणार; हुंबरण घटनेनंतर आरोग्य अधिकाऱ्यांचा निर्णय

मृत्युदर सर्वाधिक 
सुरुवातीच्या टप्प्यामध्ये फुप्फुसाच्या कर्करोगाची क्‍लिनिकल लक्षणे नसतात. त्यामुळे त्याचा मृत्युदर जास्त आहे. रुग्ण डॉक्‍टरकडे तेव्हाच जातात जेव्हा त्यांना काही लक्षणे जाणवतात; पण तोवर कर्करोग बऱ्याच पुढच्या टप्प्यावर पोहोचलेला असतो. त्यामुळे मृत्युदर वाढतो. खासकरून 50 ते 70 वर्षे वयोगटातील व्यक्तींमध्ये असा आजार आढळून येतो. 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या रुग्णांचे प्रमाण फक्त 2 टक्के असते. वयस्क रुग्णांमध्येही इतर काही कारणांमुळे स्कॅन किंवा क्ष-किरण चाचणी केली जाते तेव्हाच हा आजार लक्षात येतो. 

तब्बल दोन वर्षांनी अंधेरीतील गोखले पुलाचा मार्ग मोकळा; 112 कोटींचा खर्च येणार

धूम्रपान आणि प्रदूषण कारणीभूत 
अपोलो कॅन्सर सेंटर मेडिकल ऑन्कोलॉजी डॉ. सलील पाटकर यांच्या मतानुसार, फुप्फुसाच्या कर्करोगाची कारणे अनेक असू शकतात. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे कारण धूम्रपान करणे आहे. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला फुप्फुसाचा कर्करोग होण्याची शक्‍यता ते न करणाऱ्या व्यक्तीपेक्षा 20 पटींनी जास्त असते. इतर कारणांमध्ये हवेच्या प्रदूषणाचाही समावेश आहे. खासकरून इंधनांमुळे होणारे हवेचे प्रदूषण, ऍसबेसटॉस, आर्सेनिक आणि इतर ऍरोमॅटिक हायड्रोकार्बन्स फुप्फुसाच्या कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतात. त्याचप्रमाणे कुटुंबात आधी कोणाला फुप्फुसाचा कर्करोग झालेला असणे, पोषणातील कमतरता (अ, ब आणि क जीवनसत्त्वे), पदार्थांचा गैरवापर आणि ओपीओईड्‌सचे सेवन अशीही याची काही कारणे आहेत. 

------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lung cancer is on the rise in India; Male mortality rate is 32 percent