मुंबई : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड (एमएडीसी) कडून येत्या पाच वर्षांत राज्यात सहा नवीन विमानतळ विकसित केले जाणार असल्याची माहिती कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकणी यांनी दिली. नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटर आयोजित तिसऱ्या जागतिक व्यापार प्रदर्शनात (वर्ल्ड ट्रेड एक्स्पो) ते बोलत होते.
२०२५ पर्यंत महाराष्ट्राला विमान वाहतूक क्षेत्राला प्राधान्य देणारे ठिकाण बनविण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे विमान वाहतूक उद्योगातील संधीचा उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
राज्यात २०१६पर्यंत चार व्यावसायिक विमानतळ होते. गेल्या तीन वर्षांत ‘एमएडीसी’ने या यादीमध्ये आणखी पाच विमानतळ समाविष्ट केले आहेत. नागपूर आणि शिर्डी येथे ग्रीनफिल्ड विमानतळ कार्यान्वित झाले आहे.
पुरंदर, पुणे आणि चंद्रपूर येथील दोन ग्रीनफिल्ड विमानतळांच्या विकासाचे काम नियोजित आहे. पुढील पाच वर्षांत, ‘एमएडीसी’ने सुमारे सहा नवीन विमानतळ विकसित आणि कार्यान्वित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.