

Madh-Versova Creek bridge
ESakal
मुंबई : मालाड पश्चिम येथील मढ बेट आणि अंधेरी परिसराला जोडणाऱ्या मढ-वर्सोवा खाडी पुलाच्या कामाला गती मिळणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या विविध पर्यावरणीय परवानग्यांची पूर्तता करण्यासाठी महापालिकेने अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक कांदळवन विभाग यांच्याकडे १२ कोटी ५० लाख रुपयांचा निधी जमा करण्यास मंजुरी दिली आहे. हा निधी स्थळ विशिष्ट कांदळवन पुनर्रचना आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी वापरला जाणार आहे.