मंदिरे वाचविण्यासाठी महाआरती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

तुर्भे - गावठाणात गरजेपोटी बांधलेली घरे वाचविण्यासाठी लढा देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना आता मंदिरे वाचविण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. त्यासाठी जनजागृती केली जात आहे. महापालिकेने 29 गावांमधील पुरातन मंदिरे बेकायदा ठरवून नोटिसा बजावल्यामुळे स्थानिक महाआरती करून पालिकेच्या निर्णयाचा निषेध करीत आहेत.

देवस्थाने आणि मंदिरे वाचविण्यासाठी नवी मुंबई मंदिर समिती स्थापन केली जाणार आहे. ही समिती मंदिरे वाचविण्याचा प्रयत्न करणार आहे. या समितीत प्रत्येक गावातील प्रतिनिधींचा समावेश केला जाणार आहे. समितीचे कार्यकर्ते गावोगावी जनजागृती करून मंदिरांवरील कारवाईला विरोध करण्याचे आवाहन करणार आहेत. कोपरखैरणेतील धार्मिक स्थळांवर महापालिकेने कारवाई केल्यामुळे स्थानिकांच्या भावना दुखावल्या आहेत. असे असताना नवी मुंबईतील अनेक मंदिरांना महापालिकेने नोटिसा पाठविल्या आहेत. यातील अनेक 50-60 वर्षांची जुनी गावकीची मंदिरे आहेत. त्यांची शहानिशा न करता नोटिसा दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. रात्री उशिरा कारवाई केली जात असल्यामुळे गेल्या आठवड्यात जुहूगावातील नागरिकांनी "मंदिर बचाव'साठी रात्रभर पहारा दिला. त्यानंतर जनजागृतीसाठी महाआरती केली. कोपरखैरणे आणि बोनकोडेतील मंदिरांमध्येही महाआरत्या केल्या जाणार आहेत. गावातील या मंदिरांसाठी महापालिकेने त्याच परिसरात पर्यायी जागा द्यावी. त्यासाठी लागणारी अनामत देवस्थानांची ट्रस्ट भरणार आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे प्रभारी मंगेश म्हात्रे यांनी दिली. गावातील मंदिरांबाबत गुरुवारी बैठक झाली. या बैठकीला काही मंदिरांच्या विश्‍वस्त मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Mah Aarti for Temple saving