

Maha Vikas Aghadi conflict
ESakal
महाविकास आघाडीच्या छताखाली गेल्या 6 वर्षांपासून एकत्र नांदणाऱ्या काँग्रेस आणि उबाठा गटामध्ये सुरू असलेली 'धुसफूस' आता चव्हाट्यावर येऊ लागली आहे. दोन पक्षांमधील या बेबनावाचा परिणाम आता ' मिनी इंडिया ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीतही दिसू लागला आहे. वरिष्ठ नेत्यांच्या सातत्याने बदलणाऱ्या भूमिकांमुळे दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, 'कोणता झेंडा घेऊ हाती?' अशा कात्रीत हे कार्यकर्ते सापडले आहेत. यामुळे पुनर्विकासाच्या विरोधातील अपप्रचाराची हवाच निघून गेली आहे.