Mahad : महाड शहराच्या पश्चिम भागाला कोतुर्डे धरणातून पाणीपुरवठा केला

रस्‍त्‍याच्या कामांमुळे वारंवार जलवाहिनीला गळती
पाणीपुरवठा
पाणीपुरवठा sakal

महाड : शहराच्या बहुसंख्य भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या कोतुर्डे पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी रायगड रस्त्याच्या कामात फुटल्याने महाडकरमध्ये चार दिवसांपासून पाणीबाणी निर्माण झाली आहे. यापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात जलवाहिनी फुटली होती. वारंवार जलवाहिनी फुटल्याने महाडकर मेटाकुटीला आले आहेत.

महाड शहराच्या पश्चिम भागाला कोतुर्डे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणातून महाड शहराकडे येणारी जलवाहिनी, रायगड रस्त्याचे काम करणार्‌या ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे फुटण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण होत असल्याने शहरवासियांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.

महाड रायगड रस्‍त्‍याच्या रुंदीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून वापर केला जाणाऱ्या यांत्रिक साधनांमुळे रस्त्यालगतची जलवाहिनी अनेक वेळा फुटण्याच्या घटना घडत आहेत. तीन दिवसांपूर्वी जलवाहिनी फुटल्यामुळे शहराच्या पश्चिम व उत्तर भागात पाण्याची तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मंगळवारी दुपारपर्यंतही नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून जलवाहिनी दुरुस्‍तीचे काम सुरू होते.

सोमवारी वाहिनी दुरुस्त करून पाणी सोडले जात असतानाच पुन्हा वाहिनी फुटल्याने शहरात पाणीटंचाई निर्माण झाली. इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

काहींनी पिण्याचे पाणी तर काहींनी टँकरचे पाणी विकत घेतले आहे. पालिकेकडूनही काही भागांत टँकरने पुरवठा करण्यात येत आहे. या बाबत महामार्ग विभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

ठेकेदाराच्याच हलगर्जीमुळे जलवाहिनी फुटण्याच्या घटना सातत्याने घडत आहे. या ठेकेदारावरच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करावा तसेच टंचाईकाळात पाणी पुरवठा करणाऱ्या टॅंकरचा तसेच जलवाहिनी दुरुस्तीचा खर्चही संबंधित ठेकेदाराकडून नगरपरिषदेने वसूल करावा.

- संदीप जाधव,माजी नगराध्यक्ष, महाड

महाड नगरपालिकेकडून जलवाहिनी दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. मात्र रस्‍त्‍याच्या कामामुळे वारंवार गळती सुरू आहे. याबाबत महामार्ग विभागालाही कळविण्यात आले आहे.

- महादेव रोडगे, मुख्याधिकारी, महाड

शहरातील चवदार तळे, गोमुखी आळी, भीमनगर, गुलमोहर सोसायटी, दस्तुरी नाका, छत्रपती शिवाजी चौक, कोटेश्वरी तळे, काकरतळे या भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. इमारतीत राहणार्‌ा नागरिकांवर खालून पाणी नेण्याची वेळ आली आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे वारंवार जलवाहिनी नादुुरुस्‍त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com