बेकायदा माेटारसायकल विक्रीचा महाडमध्ये अड्डा

विक्रीसाठी आणलेल्या माेटारसायकल.
विक्रीसाठी आणलेल्या माेटारसायकल.

महाड : बेकायदा दुचाकी विक्रीचे रायगड जिल्ह्यातील महाड हे प्रमुख ठिकाण झाले आहे. त्याची दखल घेत रायगड परिवहन विभागाने सहा दुचाकी विक्रेत्यांच्या ‘शोरूम’वर छापे टाकून नोटीस दिली आहे. याप्रकरणी मुख्य विक्रेते अर्थात परवानाधारक विक्रेत्यांवर कारवाई होणार आहे. तालुक्‍यात गेल्या काही महिन्यांत ६०० पेक्षा अधिक बेकायदा दुचाकी विक्री होते अशी माहिती सूत्रांनी दिली.

महाड शहरात दुचाकी विक्री करणारे ‘राज मोटर्स’ हे एक अधिकृत विक्रेते आहेत; तर सुमारे २२ ‘सबडीलर’ अर्थात बेकायदा विक्री करणारे आहेत. त्यांच्याकडून काही माहिन्यांत ६०० दुचाकींची विक्री झाली आहे.
दिवाळी, दसरा आणि पाडव्याला त्यांच्याकडून मोठ्या संख्येने बेकायदा दुचाकींची विक्री होते. या व्यवसायात प्रचंड आर्थिक फायदा होत असल्याने अनेक जण सक्रिय झाले आहेत.
‘सबडीलर’कडे मुख्य विक्रेत्यांप्रमाणे ‘ट्रेड सर्टिफिकेट’ अर्थात मोटार वाहन विक्रीचा परवाना नसतो. त्यामुळे त्यांच्याकडून होणारी विक्री बेकायदा आहे. त्यामुळे नियमाच्या आधारे रायगड परिवहन अधिकारी ऊर्मिला पवार यांनी महाडप्रमाणेच जिल्ह्यातील बेकायदा विक्रेत्यांच्या दुकानांवर छापे टाकले आहेत. याप्रकरणी सहा विक्रेत्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, अनेक महिने वाहनांची पासिंग न होणे, चुकीचा क्रमांक मिळणे, वाहन नादुरुस्त असणे अशा अनेक प्रकारे ग्राहकांची फसवणूक होत असते.

एका प्रमाणपत्राद्वारे फसवाफसवी
मुख्य विक्रेत्यांना वाहन उत्पादकाकडून ‘ट्रेड सर्टिफिकेट’ दिले जाते. उत्पादकाकडून विक्रीची कमीत कमी मर्यादा ठरवली जाते. त्यासाठी अनामत रक्कम घेतली जाते. महाड तालुक्‍यांतील सर्व विक्रेत्यांना हे ‘ट्रेड सर्टिफिकेट’ मिळवणे शक्‍य नाही. त्यामुळे मुख्य विक्रेत्यांच्या प्रमाणपत्रावर हे स्थानिक विक्रेते वाहन विक्री करतात. दर्शनी भागात दुचाकी ठेवणे आणि अशा पद्धतीने विक्री करणे हे बेकायदा आहे.

पावलापावलावर नफा
काही बेकायदा विक्रेत्यांकडून फसवणुकीचे प्रकारही घडले आहेत. एकाच मुख्य विक्रेत्याशी करार नसल्यामुळे हे विक्रेते उत्पादन तारीख संपलेल्या मोटरसायलचीदेखील विक्री करतात. कमी किमतीत अशी वाहने या विक्रेत्यांना मिळतात. तसेच अर्थपुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून मोटरसायकलमागे काही रक्कम मिळते. सुटे भाग, वंगण यातूनही नफा मिळत मिळतो.  त्यामुळे हा व्यवसाय तेजीत अाहे.

मोटर वाहन विक्री कायद्यांतर्गत ‘ट्रेड सर्टिफिकेट’ असणाऱ्या विक्रेत्यांनाच वाहन विक्री करण्याची परवानगी आहे. परिवहन विभागाकडून ‘ट्रेड सर्टिफिकेट’ दिले जाते. असा परवाना नसेल त्या विक्रेत्यांच्या शोरूम अथवा दुकानातील गाड्यांचे चेसिस क्रमांक घेऊन तपास करण्यात येणार आहे.
- ऊर्मिला पवार, परिवहन अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com