
Mahadevi Elephant Protests: महाराष्ट्रात सध्या दोन प्रकरणांनी समाजमाध्यमे आणि जनमानसात खळबळ माजवली आहे. एकीकडे कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी (उर्फ माधुरी) हत्तीच्या स्थलांतरावरून आंदोलन पेटले आहे, तर दुसरीकडे मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक कबुतरखान्यावर झालेल्या कारवाईने नव्या वादाला जन्म दिला आहे. या दोन्ही प्रकरणांमधील घडामोडींमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेषतः, महादेवी हत्तीच्या आंदोलनाला दाबण्यासाठी कबुतरखाना प्रकरण पेटवण्यात आल्याची चर्चा आहे.