
Esakal
मुंबई : मुंबईकरांना आता मेट्रोच्या गारेगार प्रवासाबरोबरच शाॅपिंगचाही आनंद लुटता येणार आहे. त्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमएमओसीएल) मेट्रो मार्गिका २ अ आणि ७ या दोन्ही मार्गिकांच्या मेट्रो स्थानकातील जागा जवळपास ४९७ दुकांनांकरिता व्यवसायिकांना देण्याची योजना आखली आहे. त्यासाठी परवाने देण्याकरिता इच्छुकांकडून निविदा मागविल्या आहेत. या माध्यमातून महामुंबई मेट्रोला तिकिटांशिवाय नवे उत्पन्न मिळणार आहे.