Agriculture Corruption: कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचाराचे उदंड ‘पीक’; राज्यात १६५ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू

165 Agriculture Officers Face Departmental Inquiry in Maharashtra: कृषी योजनांच्या निधीपासून बोगस बियाणे, बनावट खते, कीटकनाशक परवान्यांपर्यंत गैरव्यवहारांचे धनी; संथ चौकशीमुळे १६५ अधिकाऱ्यांवरील कारवाईवर प्रश्नचिन्ह
Agriculture Department Maharashtra Faces Corruption Probe as 165 Officers and Staff Come Under Departmental Inquiry

Agriculture Department Maharashtra Faces Corruption Probe as 165 Officers and Staff Come Under Departmental Inquiry

sakal

Updated on

मुंबई : राज्याच्या कृषी यंत्रणेत पारदर्शकता आणण्याचे आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे शासकीय दावे कागदावरच राहिल्याचे चित्र आहे. विभागातील प्रशासकीय अनास्था आणि लाचलुचपत प्रकरणांचे मोठे प्रमाण समोर आले असून, कृषी आयुक्तालय, विभागीय कार्यालये आणि संपूर्ण कृषी विभागात मिळून १६५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र, ही चौकशी संथ गतीने सुरू असल्याने दोषींवर प्रत्यक्ष कारवाई होणार की हा चौकशीचा फार्स ठरणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com