महिन्यात राज्यभरात १४ भोंदूबाबांवर गुन्हे, खरात प्रकरणानंतर प्रकार उघड

Crime Case: नाशिकमध्ये घडलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर ३० दिवसांत राज्यभरात १४ भोंदूबाबांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये भोंदूबाबांनी महिलांचे लैंगिक शोषण तसेच आर्थिक फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत.
crime

Crime

Esakal 

Updated on

नवी मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का दिला. मात्र, या घटनेनंतर राज्यभरातील अनेक पीडित महिला आणि पुरुषांना अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे धैर्य मिळाले आहे. याच पार्श्वभूमीवर, गेल्या ३० दिवसांत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) पुढाकारातून राज्यभरात तब्बल १४ भोंदूबाबांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com