esakal | इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं केलेल्या सायकल रॅलीवर फडणवीसांची टीका

बोलून बातमी शोधा

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं केलेल्या सायकल रॅलीवर फडणवीसांची टीका}

सायकल रॅलीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.  कॉंग्रेसची सायकल रॅली म्हणजे निव्वळ इव्हेंट असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. 

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं केलेल्या सायकल रॅलीवर फडणवीसांची टीका
sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी राज्यातील काँग्रेसचे मंत्री, नेते आणि आमदारांनी इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढली. केंद्र सरकारकडून होत असलेल्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी ही सायकल रॅली आयोजित केली होती. या सायकल रॅलीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.  कॉंग्रेसची सायकल रॅली म्हणजे निव्वळ इव्हेंट असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. 

राज्य सरकारने पेट्रोलवर २७ रुपये टॅक्स लावला आहे. नाना पटोलेंचं आंदोलन हे राज्य सरकारच्या टॅक्सविरोधातच असावं. गुजरात किंवा इतर राज्यांप्रमाणे १० रुपयांनी पेट्रोल दर कमी करण्यात आले आहेत, तशाच प्रकारे महाराष्ट्रात देखील दर कमी करावेत, यासाठीच त्यांनी हे आंदोलन केलं असावं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अजित पवार अर्थसंकल्प मांडताना पेट्रोलवरचे राज्य सरकारचे काही टॅक्स कमी करून दर कमी करणार आहेत असं दिसत आहे. त्यामुळे त्याचं श्रेय घेण्यासाठी काँग्रेसकडून आधीच हा सायकल मोर्चा काढण्यात आला. मात्र राज्यात विरोधी पक्षाची जागा काँग्रेसला घेता येणार नाही. काँग्रेसचं देशातही विरोधी पक्ष म्हणून स्थान नाही. एकूणच काँग्रेसची अवस्था केविलवाणी आहे. या अवस्थेत त्यांना मीडिया इव्हेंट करावा लागणारच. तो ते करत आहेत, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

हेही वाचा-  ''कोविडसारख्या महामारीवर माझं सरकार नियंत्रण मिळवतंय''

 सोशल डिस्टन्सिंग हे फक्त शिवजयंतीला आहे नाईट लाईफला नाही.   वरळीत जे स्थानिक नागरिक आहेत ते आपल्या लोकप्रतिनिधींचे म्हणणे जास्तच मनावर घेतात म्हणून नाईट लाईफ सुरू राहावी हे त्यांनी मनावर घेतले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सोशल डिस्टन्सिंग कुठेचं दिसत नाही, असं फडणवीस म्हणालेत.

Maharashtra Assembly Session devendra fadnavis cirtcism congress cycle rally