esakal | हिवाळी अधिवेशन : कोण आहेत विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर?
sakal

बोलून बातमी शोधा

हिवाळी अधिवेशन : कोण आहेत विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर?

विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदी प्रविण दरेकरांची निवड झाली. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रविण दरेकर यांच्या नावाची घोषणा केली.

हिवाळी अधिवेशन : कोण आहेत विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

2019 विधानसभा निवडणुकांचे निकाल लागलेत आणि त्यानंतर अनपेक्षित राजकीय नाट्य महाराष्ट्राला पाहायला मिळालं. तब्बल एक महिन्याचा प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपला विरोधी बाकांवर बसायला लागलं. पुढे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते म्हणून सूत्र हातात घेतली. अशात चर्चा होती ती विधानपरिषदेचा विरोधीपक्ष नेता कोण होणार याची. भाजप आणि शिवसेना सरकारमध्ये धनंजय मुंडे विधान परिषदेचे विरोधीपक्ष होते. आता विरोधी बाकावर भाजप असल्याने भाजपच्या कोणत्या नेत्याची या पदावर वर्णी लागणार याची सर्वत्र चर्चा होती. 

महत्त्वाची बातमी :  हिवाळी अधिवेशन : ही ब्रिटिशांची विधानसभा आहे का? : देवेंद्र फडणवीस 

आज नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरवात झाली. विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदी प्रविण दरेकरांची निवड झाली. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रविण दरेकर यांच्या नावाची घोषणा केली. प्रविण दरेकरांनी आमदार सुरजितसिंह ठाकूर, भाई गिरकर यांना मागे टाकत विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेतेपद मिळवले. शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या दरेकरांनी. राज ठाकरेंसह मनसेमध्ये दशकभर काम केलं. त्यानंतर 2014 मध्ये विधानसभा पराभवानंतर दरेकरांनी मनसेला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. 

महत्त्वाची बातमी : शिवस्मारक तर होणारच, पण भ्रष्टाचारही समोर आणणार : नवाब मलिक

प्रवीण दरेकर यांची राजकीय कारकीर्द : 

  • प्रवीण दरेकर यांनी आपली राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरु केली 
  • प्रवीण दरेकर हे एकदा विधानसभेचे आमदार राहिलेत.
  • मुंबईतील मागठाणे जागेवरून त्यांनी विधानसभेची जागा जिंकिली होती.   
  • 2009 साली प्रवीण दरेकर यानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर आमदारकीची निवडणूक लढवली. 
  • 2009 ते 2014 या काळात दरेकर आमदार राहिलेत.  
  • 2014 मध्ये प्रवीण दरेकर यांचा पराभव झाला.
  • 2014 मध्ये पराभवाला समोरे गेल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला.    

Webtitle : maharashtra assembly winter session political journey vidhan parishad opposition leader pravin darekar