esakal | अधिवेशनाचा दुसरा दिवस, आज कोणत्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक होणार?
sakal

बोलून बातमी शोधा

अधिवेशनाचा दुसरा दिवस,  आज कोणत्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक होणार?

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे.  अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधक आक्रमक झाले होते.

अधिवेशनाचा दुसरा दिवस, आज कोणत्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक होणार?

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई:  अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे.  अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधक आक्रमक झाले होते. आज पुन्हा एकदा वाढीव वीज बिल आणि कोविडमधील भ्रष्टाचार या मुद्द्यावर विरोधक आक्रमक होणार आहे. कामकाज सुरू होण्यापूर्वीच विरोधक विधान भवनाच्या पायर्‍यांवर ती आंदोलन करणार आहेत.  

विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणवर चर्चा झाल्यानंतर कोविडवरती चर्चा आहे. या चर्चेदरम्यान कोविड सेंटरमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा विरोधक उपस्थित करणार आहेत.  त्यावरून सभागृहात गोंधळ होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आजचं कामकाज किती होणार आहे यावर प्रश्नचिन्ह आहे.

अधिवेशनापूर्वी काँग्रेस- भाजप आमनेसामने

कालपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले होते. सभागृहाबाहेर काँग्रेस आमदार केंद्रातल्या मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते. तर दुसरीकडे भाजप नेते राज्य सरकारविरोधात घोषणा देत होते.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

काँगेस नेत्यांनी इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढली. रॅली विधान भवनात येताच काँग्रेस आणि भाजप आमदार आमने सामने आले. इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यासाठी महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर काँग्रेस आमदार सायकलवरुन विधानभवानाकडे रवाना झाले.

maharashtra budget session 2021 second day 2nd march

loading image