काँग्रेस भाकरी फिरवणार; चार मंत्र्यांना नारळ दिला जाण्याची शक्यता

तीन कॅबिनेट आणि एका राज्यमंत्र्याच्या कामगिरीवर पक्षश्रेष्ठी समाधानी नसल्याने या मंत्र्यांचे राजीनामे घेतले जाण्याची शक्यता
maharashtra budget session 2022 tea all party time four ministers Congress Resignation
maharashtra budget session 2022 tea all party time four ministers Congress Resignation

मुंबई : सत्तास्थानात बसूनही गेल्या दोन-सव्वादोन वर्षांत नेमका लाभ पदरात पडत नसल्याच्या जाणिवेतून काँग्रेसने थेट आपल्या चार मंत्र्यांना घरी बसविण्याचा पवित्रा घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यात तीन कॅबिनेट आणि एका राज्यमंत्र्याच्या कामगिरीवर पक्षश्रेष्ठी समाधानी नसल्याने या मंत्र्यांचे राजीनामे घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याजागी आक्रमकपणे पक्षीय अजेंडा राबविणाऱ्या नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. त्यामुळे नेमक्या कोणत्या मंत्र्याला डच्चू मिळणार आणि कोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार, याची उत्सुकता आहे.

विधिमंडळाचे अधिवेशन आटोपताच हे बदल होण्याची चिन्हे असून, सरकारमधील चुका १० मार्चनंतर दुरुस्त केल्या जाणार असल्याचे सांगून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाकरी फिरविण्याचेच संकेत दिले होते. अकार्यक्षम मंत्र्यांना बदलून स्व:पक्षातील बड्या नेत्यांसह मित्रपक्षांनाही इशारा देण्याची काँग्रेसची नवी चाल असल्याचे मानले जात आहे.

काँग्रेस श्रेष्ठींचे आक्षेप

  • पक्षीय पातळीवर कामचुकारपणा

  • सरकारमध्ये मित्रपक्षांच्या सुरात सूर मिसळणे

  • सरकार, प्रशासनावर पकड बसविण्यात ढिलाई

मित्रपक्षांच्या तुलनेत काँग्रेस कमी

काँग्रेसचा हात धरून हे सरकार आले असतानाही मित्रपक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस मात्र, सत्तेच्या माध्यमातून पूर्वीप्रमाणे आपापले वर्चस्व वाढवत आहेत. या दोघा पक्षांच्या तुलनेत काँग्रेस कमी पडत आहे. त्याचवेळी या सत्तेच्या माध्यमातून शिवसेना, राष्ट्रवादीतील जवळीकता काँग्रेससाठी धोक्याची घंटा असल्याचेही बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com