CM Devendra Fadnavis instructs officials to submit Wainganga–Nalganga irrigation project report by October 15 deadline.
मुंबई: राज्यातील महत्त्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे विदर्भ आणि मराठवाडा विभागातील पाणीटंचाई दूर करण्यासोबतच शेतीला शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत शासनाकडे सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.