सामनाची 'भाषा' आणि 'दिशा' याबाबत उद्धव ठाकरे यांची मोठी वाच्यता, म्हणालेत...

सामनाची 'भाषा' आणि 'दिशा' याबाबत उद्धव ठाकरे यांची मोठी वाच्यता, म्हणालेत...

मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी प्रामुख्याने चार मुद्द्यांवर माध्यमांशी चर्चा केली. यामध्ये सामनातील संपादकपद रश्मी ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केल्यानंतर जे वाद निर्माण होतायत यावर भाष्य केलं. यानंतर उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील यांनी कर्जमाफीबद्दल माध्यमांना माहिती दिली. उद्धव ठाकरे यांचा ७ तारखेला अयोध्या दौरा आहे, याबाबत देखील उद्धव ठाकरे यांनी आपली मतं मांडली आणि मुस्लिम आरक्षणावर देखील उद्धव ठाकरे यांनी आपली बाजू मंडळी आहे.  

संपादकीय लिहिण्याची जबाबदारी संजय राऊतांवरच 

सामनातील संपादकपद रश्मी ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केल्यानंतर पहिल्याच संपादकीयमधून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधण्यात आला. यामध्ये चंद्रकांत पाटील यांना 'दादामियां' संबोधण्यात आलं होतं. यावर रश्मी ठाकरे यांच्याकडून 'ही' अपेक्षा नव्हती असं चंद्रकांत पाटील म्हणालेत. दरम्यान संजय राऊत हे सामना संपादकीय लिहिलण्याची जबाबदारी योग्य प्रकारे सांभाळत आहेत. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या संपादकीय लिहिण्याची जबाबदारी संजय राऊत यांच्याकडेच राहणार आहे. ‘सामना’मधील भाषा ही आमची पितृभाषा आहे. त्यामुळे ‘सामना’ची भाषा आणि दिशा बदलणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केलंय. 

कर्जमाफीची दिली माहिती 

यानंतर उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफी बद्दलची माहिती माध्यमांसमोर सादर केली. पहिली यादी जाहीर झाल्यानंतर 'ज्या गतीने शेतकरी कर्जमाफी दिली जातेय त्या गतीने ४०० महिने लागतील", असं फडणवीस म्हणाले होते. यावर उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं.

काही जिल्ह्यांमध्ये निवडणूक असल्याने आचारसंहितेच्या कारणामुळे शेतकरी कर्जमाफीच्या याद्या जाहीर करता येणार नाहीत. सदर जिल्ह्यातील पाच लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्या तयार आहेत मात्र त्या जाहीर करता येणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करणारच, एनपीएची अडचण नाही असं देखील उद्धव ठाकरे म्हणालेत. 

यामध्ये कुणी राजकारण आणू नये 

७ तारखेला उद्धव ठाकरे यांचा नियोजित अयोध्या दौरा आहे. ज्यानं ज्यांना शक्य असेल त्यांनी या अयोध्या दौऱ्यात सहभाग घ्यावा. ७ तारखेला अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणारच, यामध्ये कुणीही राजकारण आणू नये. असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. 

आमच्यासमोर कोणताही प्रस्ताव नाही

उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम आरक्षणाबाबत देखील माध्यमांसमोर आपलं मत मांडलं. अजूनही आमच्यासमोर असा कोणता प्रस्ताव आलेला नाही. याबाबतीत आदळ आपट करणार्यांनी शांतता राखावी असं देखील आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

maharashtra cm uddhav thackeray on samana editorial loan wavier and muslim reservation

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com