esakal | आजचा आकडा साडे चारशे पार, आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणतात...
sakal

बोलून बातमी शोधा

आजचा आकडा साडे चारशे पार, आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणतात...

राज्यातील एकूण रुग्ण संख्या 4666, आज  466 नवीन रुग्णांचे निदान

आजचा आकडा साडे चारशे पार, आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणतात...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई, ता. 20 : आज राज्यात कोरोनाबाधीत 466 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या 4666 झाली आहे. 65 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 572 रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण 3862 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 76 हजार 92 नमुन्यांपैकी 71 हजार 611 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 4666 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यातील 2336 रुग्णांचे विश्लेषण केले असता त्यापैकी 1890 ( 81 टक्के) रुग्ण हे लक्षणविरहित आहेत तर 393 रुग्णांना ( 17 टक्के) रुग्णांना लक्षणे होती. या रुग्णांपैकी 53 रुग्ण ( 2 टक्के) हे अतिदक्षता विभागात भरती आहेत. सध्या राज्यात 93 हजार 655 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 6,879 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मोठी बातमी - "समुद्रातील मासे खाऊ नका, कारण कोरोनाचे मृतदेह फेकले जातायत समुद्रात !" काय आहे सत्य असत्य...

आज राज्यात 9 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील मुंबई  येथील 7 आणि मालेगाव येथील 2  रुग्णांचा समावेश आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी  6  पुरुष तर 3 महिला आहेत. त्यामध्ये 60 वर्षे किंवा त्यावरील  5  रुग्ण आहेत तर 1  रुग्ण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत तर एक रुग्ण 40 वर्षांखालील आहे.  मालेगाव येथील मृत्युमुखी पडलेल्या 2 रुग्णांना इतर काही आजार आहेत का याची माहिती अद्याप अप्राप्त आहे.   उर्वरित 7  जणांपैकी 5 रुग्णांमध्ये ( 71 टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 232 झाली आहे. 

मोठी बातमी - 'या' ५ गोष्टी देतायेत अशुभ संकेत; महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये स्थिती होतेय अधिक बिकट?

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: 3032 (139)
ठाणे: 20 (2) 
ठाणे मनपा: 134 (2)
नवी मुंबई मनपा: 83 (3)
कल्याण डोंबिवली मनपा: 84 (2)
उल्हासनगर मनपा: 1
भिवंडी निजामपूर मनपा: 3
मीरा भाईंदर मनपा: 78 (2)
पालघर: 17 (1)
वसई विरार मनपा: 107 (3)
रायगड: 15
पनवेल मनपा: 33 (1)
ठाणे मंडळ एकूण: 3607 (155)

नाशिक: 4
नाशिक मनपा: 6
मालेगाव मनपा:  85 (8)
अहमदनगर: 21 (2)
अहमदनगर मनपा: 8
धुळे: 1 (1)
धुळे मनपा: 00
जळगाव: 1
जळगाव मनपा: 2 (1)
नंदूरबार: 1
नाशिक मंडळ एकूण: 129 (12)

पुणे: 18 (1)
पुणे मनपा: 594 (49)
पिंपरी चिंचवड मनपा: 51 (1)
सोलापूर: 00
सोलापूर मनपा: 21 (2)
सातारा: 13 (2)
पुणे मंडळ एकूण: 697 (55)
कोल्हापूर: 5
कोल्हापूर मनपा: 3
सांगली: 26
सांगली मिरज कुपवाड मनपा:1
सिंधुदुर्ग: 1
रत्नागिरी: 7 (1)
कोल्हापूर मंडळ एकूण: 43 (1)
औरंगाबाद:1
औरंगाबाद मनपा: 29 (3)
जालना: 1
हिंगोली: 1
परभणी: 00
परभणी मनपा: 1
औरंगाबाद मंडळ एकूण: 33 (3)

मोठी बातमी - अरे व्वा! दहावीच्या विद्यार्थ्याचे संशोधन तेही कोरोनाचा संसर्ग रोखणारे

लातूर: 8
लातूर मनपा: 00
उस्मानाबाद: 3 
बीड: 1
नांदेड: 00
नांदेड मनपा: 00
लातूर मंडळ एकूण: 12

अकोला: 7 (1)
अकोला मनपा: 9
अमरावती: 00
अमरावती मनपा: 6 (1)
यवतमाळ: 15
बुलढाणा: 21 (1)
वाशिम: 1 
अकोला मंडळ एकूण: 49 (3)

नागपूर: 3
नागपूर मनपा: 67 (1)
वर्धा: 00
भंडारा: 00
गोंदिया: 1
चंद्रपूर: 00
चंद्रपूर मनपा: 2
गडचिरोली: 00
नागपूर मंडळ एकूण: 73 (1)
इतर राज्ये: 13 (2)
एकूण: 4666  (232)

(या तक्त्यातील रुग्ण संख्या रुग्णाने दिलेल्या पत्त्यानुसार आहे. काही रुग्णांचे प्रत्यक्ष वास्तव्य वेगळीकडे असू शकते. जिल्हा, मनपांनी उपलब्धकरून दिलेल्या पत्त्यानुसार रुग्णसंख्येत बदल झालेला आहे. चंद्रपूर मनपातील रुग्ण हे परदेशात संसर्गग्रस्त झालेले आहेत)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 368 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 6359 सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी 23.97 लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. 

maharashtra corona positive cases increased by 466 rajesh tope shared information

loading image