

Maharashtra Court Bomb Threat News Palghar Thane Satara Beed Solapur Nashik and Parbhani Courts Receive Threat Emails
esakal
पालघर: पालघर सत्र न्यायालय आणि जिल्हा न्यायालयामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने सोमवारी (ता. २) न्यायालय परिसरात खळबळ उडाली. दुपारी ३.११ वाजता स्फोट घडविण्यात येईल, अशी धमकी या संदेशातून देण्यात आल्याने पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण न्यायालय परिसर रिकामा करण्यात आला.